Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळला ; संपर्कातील १४ जणांची केली कोव्हीड तपासणी

najarkaid by najarkaid
December 25, 2023
in जळगाव, राज्य
0
जळगावात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळला ; संपर्कातील १४ जणांची केली कोव्हीड तपासणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – देशासह राज्यात कोरोनाच्या JN1 या सब व्हेरियंटमुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्रात या व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला ४३ वर्षीय रुग्ण आढळून आला आहे.सदर रुग्ण भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील असून काही दिवसापूर्वी तो नेपाळ वरून आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान त्याच्या संपर्कातील १४ जणांची कोव्हीड तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

आरोग्य यंत्रणा अलर्ट 

भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील ४३ वर्षीय रुग्नाची प्रकृती उत्तम आहे. एचआरसिटी रिपोर्ट २४ आहे, म्हणेचं चिंतेच कारण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.तरी राज्यातील परिस्थिती पाहता व मुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वीच प्रशासनाला दिलेल्या सूचना यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट आहेचं दरम्यान या संपूर्ण परिस्थिवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वतः लक्ष देऊन आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या रुग्णाला ताप, कफ आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांच्या उपचार सुरू होते. मात्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशावरून कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या तपासणी जिल्ह्यात करण्यात येत असून त्यात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे

देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेदुखी वाढवली असून पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावेळी कोरोनाचा JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. दिवसेंदिवस या व्हेरीएंटचे रुग्ण वाढतांना दिसत असल्याने आरोग्य यंत्रनेचे टेन्शन वाढवलं आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून सर्वच आरोग्य यंत्रणांना अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील यंत्रणा देखील अलर्ट कारण्यात आली आहे. या रुग्णासाठी GMC जीएमसीमध्ये १०० बेड व ५० व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांनंतर आवश्यकतेनुसार अधिक सुविधा वाढविण्यात येतील अशी माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.दरम्यान JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आला असला तरी जळगाव जिल्ह्यात अजून तरी या व्हेरिएंटचा रुग्ण मिळून आलेला नाही तरीही काळजी म्हणून आरोग्य यंत्रणा अलर्टमोड आहेत.

घाबरू नका… काळजी घ्या 

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट आहे.सध्या तरी जळगाव जिल्ह्यात या नव्या  JN1 जेएन–वन नवीन व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही. या व्हेरिएंटमुळे भीती बाळगण्याची गरज नाही.परंतु काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

जेएन.१ इतर कोरोना प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य किंवा गंभीर आहे का?

JN.1 BA.2.86 शी संबंधित आहे जो Omicron चा वंशज आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली होती. तज्ञांच्या मते, दोन्ही रूपे जवळजवळ समान आहेत. त्यांच्या स्पाइक प्रथिनांमध्ये फारच थोडा फरक आहे. स्पाइक प्रोटीन हा विषाणूचा भाग आहे ज्यामुळे तो मानवी पेशींवर हल्ला करू शकतो. नवीन प्रकार रोगप्रतिकारक शक्तीला चकित करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. म्हणजे संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.

कोविड प्रकार JN.1 ची लक्षणे कोणती आहेत?

कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराच्या लक्षणांमध्ये या गोष्टींचा समावेश आहे: ताप थकवा वाहती सर्दी घसा खवखवणे डोकेदुखी खोकला गर्दी काही प्रकरणांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या

WHO चे जेएन-वन नवीन व्हेरिएंट बद्दल काय म्हणते 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 ला ‘वैरिएंट ऑफ इंटरेस्ट’’ म्हणून घोषित केले आहे. यामुळे जागतिक सार्वजनिक आरोग्याला फारसा धोका नाही, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, तो आता BA.2.86 च्या वंशाचा आहे जो ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंझा डेटा (GISAID) शी संबंधित आहे. तथापि, अलिकडच्या आठवड्यात अनेक देशांमध्ये JN.1 ची प्रकरणे समोर येत आहेत. त्याचा प्रसार जागतिक स्तरावर झपाट्याने वाढला आहे.

काळजी घेण्यासाठी नेमकं काय कराल…

देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीदरम्यान, डॉक्टरांनी लोकांना मास्क घालण्याचा, गर्दी टाळण्याचा आणि सकस आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. JN.1 प्रकाराबाबतही अशीच सावधगिरीची पावले उचलावी लागतील.

 खबरदारीचे उपाय खालीलप्रमाणे

 साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवा साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास, कमीतकमी 60 टक्के अल्कोहोलसह हँड सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे मास्कने नाक आणि तोंड व्यवस्थित झाकणे दोन व्यक्तिमधील अंतर ठेवा.

इतर बातम्या….

शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान शोधून काढलं ; माणसाचा मृत्यू कधी होणार हे समजू शकणार

पतीने केला तरी बलात्कार हा बलात्कारच असतो… वैवाहिक बलात्कारावर हायकोर्ट काय म्हणाले वाचा !

कायद्यात बदल ; आता तारीख पे तारीख होणार नाही… खुनाचे कलम ३०२ नव्हे तर आता १०१ असेल, बलात्काराच्या कलम मध्येही बदल

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ना क्लास, ना अभ्यासवर्ग : जळगावची विद्यार्थिनी MPSC परीक्षेत पास

Next Post

नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us