- जनतेचे प्रश्न सोडविण्याची संधी द्या – अभिषेक पाटील
- जळगाव शहर मतदार संघात प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत
- मतदारांची प्रचंड गर्दी : समता नगर परिसरात कॉर्नर बैठक
- नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत सत्ताधार्यांवर केली नाराजी व्यक्त

जळगाव (प्रतिनिधी)- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक शांताराम पाटील यांचा जळगाव शहर मतदार संघात आज प्रचार दौरा काढण्यात आला होता या प्रचाराच्या झंझावातात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी अभिषेक पाटील यांनी यांनी मतदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
समता नगर येथे कॉर्नर बैठकी दरम्यान नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.तर समता नगर येथे भविष्यात एकही समस्या शिल्लक राहणार नही असे अभिषेक पाटील यांनी मतदारांशी संवाद साधतांना आश्वासन दिले.दिवस भरात मतदार संघात भव्य प्रचार रॅली काढण्यात आल्याने या प्रचाराच्या झंझावातात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व अभिषेक पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.















