- निवडणूक काळातील जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

जळगाव – चोरवड नाक्यावर मध्यप्रदेश परिवहन बसमधून एका इसमाकडून 29 लाख 400 रूपयांची रक्कम स्थिर निगराणी पथकाच्या तपासणीत पकडण्यात आली असल्याची माहिती रावेर विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी डाॅ. अजित थोरबोले यांनी दिली आहे.
पकडलेल्या रक्कमेबाबत सदर इसमाने सबळ पुरावे सादर न केल्याने रक्कम जप्त करण्यात आली असून तजवीज ठेवून सदरची रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे.निवडणूक काळातील जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.














