चोपडा, (मिलिंद सोनवणे) – येथील उपजिल्हा रुग्णालयात आज 44 कोरोना संशयितांचा स्वॅब घेण्यात आले आहे.यापूर्वी याठिकाणी 33 जणांचे स्वॅब घेण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लासूरकर यांनी दिली.चोपडा येथे आतापर्यंत कोरोना बाधित सहा रुग्ण आढळून आले आहेत.जिल्हा प्रशासनाने तालुका स्तरावर तपासण्या वाढवल्याने कोरोना संशयित रुग्ण तपासणीला गती आली आहे.
दिवसेंदिवस कोरोना संसर्ग लागण असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक उपाय योजना राबविण्यात येत आहे.सुरवातीला फक्त वैद्यकीय महाविद्यालय जळगाव या ठिकाणीच कोविड संशयितांचे स्वॅब घेतले जायचे मात्र रुग्णांची वाढती संख्या व जास्तीत जास्त तपासण्या होऊन संसर्ग थांबविण्याच्या हेतूने जिल्हा प्रशासनाने तालुका स्तरावर स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने गेल्या काही दिवसा पासून कोविड संशयितांच्या तपासण्या वाढल्या असून प्रशासनाच्या या उपाय योजने मुळे स्थानिक पातळीवर तपासण्या करून घ्यायला देखील समोर येत आहे. तपासण्या वाढल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.