Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या राज्यातील ६ कंत्राटदार एजन्सी बडतर्फ ; महावितरणचा दणका

najarkaid live by najarkaid live
February 15, 2022
in राज्य
0
१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव/धुळे/नंदुरबार, दि. १५ फेब्रुवारी २०२२ : महावितरणने वीजग्राहकांकडील मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास, मनस्ताप देणाऱ्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सीना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे.

 पुणे जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गेल्या चार दिवसांमध्ये थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

 ऊर्जामंत्री श्री.नितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे, असे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दि. १ फेब्रुवारीला राज्यभरातील मीटर रीडिंग एजन्सीसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला होता. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई सोबतच एजन्सी व संबंधित कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.

 एजन्सीने केलेल्या मीटर रीडिंगची पडताळणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या पडताळणीमध्ये बारामती परिमंडलामधील परिमल एंटरप्रायजेस, पांडरे ता. बारामती (सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायजेस, सादलगाव ता. शिरूर (केडगाव विभाग), कल्याण परिमंडलामधील सुप्रीम पॉवर सर्व्हीसेस, अंधेरी (वसई विभाग), नांदेड परिमंडलामधील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल, दहेली ता. किनवट (भोकर विभाग), औरंगाबाद परिमंडलामधील नंदिनी एंटरप्रायजेस (औरंगाबाद शहर विभाग २) आणि अकोला परिमंडलामधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (अकोला शहर विभाग) या सहा एजन्सीद्वारे सुरू असलेल्या मीटर रीडिंगच्या कामात कुचराई होत असल्याचे आढळून आले. परिणामी या एजन्सीविरुद्ध थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 या बडतर्फ एजन्सीकडून वीज मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे, महावितरणला अचूक रीडिंग घेत असल्याची खोटी माहिती देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून आले. यामुळे महावितरणच्या महसुली नुकसानीसोबतच वीजग्राहकांनादेखील चुकीच्या वीजबिलांच्या दुरुस्तीसाठी मनस्ताप व त्रास झाल्याचे दिसून आले. त्याची गांभीर्याने दखल घेत याआधीच दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे महावितरणकडून मीटर रीडींग एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर कंत्राटदारांना कामात कुचराई केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर..!

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षेची तारीख वेळ जाहीर

Related Posts

क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

July 29, 2025
PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

July 29, 2025
Pune Rave Party: एकनाथ खडसेंची पुण्यात पत्रकार परिषद,पोलिसांवर थेट गंभीर आरोप

Pune Rave Party: एकनाथ खडसेंची पुण्यात पत्रकार परिषद,पोलिसांवर थेट गंभीर आरोप

July 29, 2025
Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

July 29, 2025
High Tide Alert in Konkan: कोकण किनारपट्टीवर ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा

High Tide Alert in Konkan: कोकण किनारपट्टीवर ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा

July 28, 2025
Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षेची तारीख वेळ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षेची तारीख वेळ जाहीर

ताज्या बातम्या

Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

July 29, 2025
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

July 29, 2025
क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us