Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी सरसावल्या दोन माता, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

आरटीओंना दिले निवेदन, पोलीस अधीक्षक, जि.प. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार

najarkaid by najarkaid
March 18, 2024
in जळगाव
0
चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी सरसावल्या दोन माता, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.१८ – जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत व्हॅनमध्ये गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जळगावातील घटनेने पालक मन चिंतीत झाले असून जिल्ह्यात आणखी कुठे असे प्रकार झाले असावे किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर्सरी ते ५ वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या दृष्टीने जळगावातील हेतल वाणी व कल्पिता पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या मागण्यांच्या दृष्टीने त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

जळगाव जिल्ह्यात हजारो शाळा असून त्यात प्ले ग्रुप ते माध्यमिक शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी – विद्यार्थिनी शिक्षण घेतात. अनेक शाळा या गावाबाहेर असल्याने विद्यार्थी स्कूल व्हॅन किंवा रिक्षाद्वारे ये – जा करतात. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत व्हॅनमध्ये गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात हजारो विद्यार्थिनी रिक्षा, व्हॅनद्वारे शाळेत ये – जा करतात. त्यामुळे इतर कुणासोबत ही असा प्रकार झाला असावा किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजात अशी विकृती अनेक असू शकतात. नुकतेच समोर आलेल्या घटनेने सर्वच पालक चिंतीत असून समाजमन सुन्न झाले आहे. प्रत्येक पालकाच्या मनात असलेली भीती दूर करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.

चिमुकल्यांच्या पालक असलेल्या हेतल वाणी आणि कल्पिता पाटील यांनी निवेदनाव्दारे, जिल्ह्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या नर्सरी ते ५ वी वर्गातील प्रत्येक विद्यार्थी – विद्यार्थिनीला शाळेत ‘गुड टच – बॅड टच’चे प्रशिक्षण देण्यात यावे., विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक रिक्षा, स्कूल व्हॅन चालक – मालक यांची नोंद शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे असणे बंधनकारक करावे, स्कूल व्हॅन आणि रिक्षामध्ये शक्य असल्यास सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यात यावा, स्कूल व्हॅन आणि रिक्षाला जीपीएस बसविणे सक्तीचे करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी योग्य विषयाला हात घातल्याचे सांगत महिला व बालविकास अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना याबाबत सूचित करण्याच्या सूचना केल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांची भेट घेऊन निवेदन दिले असून त्यांनी देखील शासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, निवेदन पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील देण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जेष्ठ पत्रकार डॉ उदय निरगुडकर यांचा राज्य पत्रकार संघाच्या वतीने चाळीसगाव येथे सत्कार

Next Post

तरुण-तरुणींनी व्यसन आणि फॅशन यांच्या नादात पडू नये ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर

Related Posts

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post
तरुण-तरुणींनी व्यसन आणि फॅशन यांच्या नादात पडू नये ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर

तरुण-तरुणींनी व्यसन आणि फॅशन यांच्या नादात पडू नये ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us