Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव येथे सुरु होणार सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र :आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

najarkaid live by najarkaid live
May 10, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव, (प्रतिनिधी)तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. लॉकडाऊनमुळे कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण व शासनाची हमीभावाने कापूस खरेदी केंद्रे बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर शिल्लक असलेला कापूस हा नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी भावाने विकावा लागत होता. तसेच कापसात पिसे पडत असल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चाळीसगाव येथील सत्यम कोटेक्स प्रा.लि.भोरस येथे मान्यता मिळालेले सीसीआय – कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती, मात्र खरेदी केंद्रावर मजूर उपलब्ध होत नसल्याने तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे एप्रिल व मे महिन्यासाठी कापसाच्या दर्जाबाबत असलेल्या अटी – शर्थीमुळे सत्यम कोटेक्स तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास टाळाटाळ केली जात होती. आमदार मंगेश चव्हाण यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणू दिली असता त्यांनी तात्काळ भारतीय कपास निगमचे केंद्र प्रमुख जे पी सिंग यांची बैठक बोलावून माहिती जाणून घेतली तसेच खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत येणाऱ्या अडचणींबाबत मा.महाप्रबंधक सो, भारतीय कपास निगम लि., औरंगाबाद यांना पत्र देऊन सूचना केल्या होत्या.

चाळीसगावच्या खरेदी केंद्राबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजीमंत्री गिरीश महाजन यांनादेखील कळवले असता नामदार पाटील व आमदार महाजन यांनी सीसीआय चे महाप्रबंधक यांच्याशी फोनवर याबाबत चर्चा केली होती. जळगाव येथे कोरोना संदर्भात उपाययोजना बाबत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची आमदार चव्हाण यांनी मागील आठवड्यात भेट घेतली तेव्हादेखील त्यांनी जिल्हाधिकारी महोदय यांनी चाळीसगाव येथील कापूस खरेदी केंद्र याबाबत वैयक्तिक लक्ष द्यावे अशी विनंती केली असता त्यांनीदेखील हा महत्वाचा मुद्दा असून याबाबत सीसीआय कडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सीसीआयच्यावतीने सत्यम कोटेक्स येथे कापूस खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवार दि.११ मे पासून चाळीसगाव कृषी उत्पन बाजार समिती येथे त्यांनी दिलेल्या 9561369406 या मोबाईल क्रमांकावर फोन करून शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. नाव नोंदणीसाठी कुणीही बाजार समितीत येऊ नये असे आवाहन सभापती सरदारसिंग राजपूत व उपसभापती किशोर पाटील यांनी केले आहे.

खरेदी केंद्राच्या ठिकाणी अत्यावश्यक असणारी कागदपत्रे

१) सन २०१९-२० चा कापूस पिकपेरा असलेला व तलाठी यांचा सहीशिक्का असलेला ७/१२ उतारा

२) शेतकऱ्याच्या बँक पासबुक झेरॉक्स ज्यात IFSC कोड असणे गरजेचे।

३) आधार कार्ड झेरॉक्स

कापूस खरेदीच्या ठिकाणी येताना शेतकऱ्यांनी मास्क किंवा तोंडावर रुमाल वापरणे बंधनकारक असून सोशल डिस्टनसिंग पाळणे गरजेचे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव शहरात आजपासून १७ मे पर्यंत जनता कर्फ्यु

Next Post

सन ऑफ सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्थेतर्फे भगवान  गौतम बुद्ध यांची २५६४ वी जयंती साजरी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांकडून तथागतांना त्रिवार वंदन; जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा !

सन ऑफ सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्थेतर्फे भगवान  गौतम बुद्ध यांची २५६४ वी जयंती साजरी

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us