चाळीसगाव ;- शहरातील पंडित मोतीराम सराफ यांच्या दुकानातून ९० ग्राम वजनाचे सोने चोरीला गेल्याची घटना घडली होती . याप्रकरणी पोलिसांनी शिताफीने आरोपीला मालेगाव येथून पकडले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पंडित मोतीराम सराफ यांच्या दुकानातून ९० ग्राम वजनाचे सोने चोरीला गेल्याने शहर पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी वेगाने तपासचक्रे हलवीत डीबी पथकातील पोना राहुल पाटील, पोकॉ गोवर्धन बोरसे, गोपाळ बेलदार , प्रवीण सपकाळे, यांच्या पथकाने दागिने चोरणाऱ्या हैदर सादिक सैय्यद वय २९ रा. भिवंडी ह.मु. मालेगाव याला ९ रोजी सापळा रचून अटक केली . त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून आरोपीला पकडल्याबद्दल सराफ व्यावसायिक शामकांत भामरे आदींनी पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. आरोपीविरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.