चाळीसगाव( किशोर शेवरे)चाळीसगांव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी मा. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट घेऊन ऊस तोडणी लवकर करून ऊसाला जास्तीत जास्त योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या सकारात्मक चर्चेत ना. थोरात यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या वेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब, योगेश राजधर पाटील, ईश्वर बापू ठाकरे, भगवान बापू राजपुत, रवींद्र केदारसिंग पाटील, बाजीराव नाना दौड, किशोर माधवराव पाटील, जितेंद्र पाटील, अशोक तात्या राजपुत, ऋषिकेश अमृतकार व चाळीसगांव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
















