टिटवाळा : टिटवाळा स्टेशनवर रात्रीच्या सुमारास पु्ष्पक एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मला लागली. गाडीचा वेग कमी होताच एक व्यक्ती घाईघाईने बॅग घेऊन चालत्या गाडीतून खाली उतरला. टिटवाळा आरपीएफला त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली बॅग उघडताच समोर जे दृश्य दिसले ते पाहून कल्याण रेल्वे पोलिसही चक्रावून गेले.
बॅग मध्ये तब्बल 1 कोटी 71 लाखाचे सोने व 56 रोख रक्कम असा मुद्देमाल आढळून आले. जीपी मोंडल असे या व्यक्तीचे नाव असून लखनऊ येथून त्याने व्यापारासाठी हा माल आणला असल्याचे सांगितले. मात्र त्याच्याजवळ कोणतीही कागदपत्रे आढळून आली नसल्याने रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत आयकर विभागाकडे पुढील तपास पाठविला आहे.
सदर व्यक्ती 1 ऑक्टोबर रोजी रात्री टिटवाळा स्थानकात उतरला. चालत्या गाडीतून घाईगडबडीत उतरल्याने आरपीएफला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. मात्र चौकशीत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने आपले नाव जीपी मोंडल असून आपण नवी मुंबईतील रहिवासी आहे, तसेच तो सोन्याचा व्यापार करतो आणि लखनौ येथून आला आहे, अशी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याला बॅगेत काय आहे, असे विचारले असता तो गडबडला.
हे पण वाचा :
…अन्यथा मी केस करेल ; गायक आनंद यांचा राज्यपालांचा थेट इशारा !
दिवाळीत सोने स्वस्त होणार, तेलाचे दरही घसरणार, सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळणार
तरुणाला प्रेयसीला गुपचूप भेटणं महागात पडलं ; पुढे काय झालं पहा VIDEO मध्येच..
बॅगेत आढळले पावणे कोटीचे घबाड
पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बॅग उघडून दाखवली. यावेळी बॅगेत तब्बल 1 कोटी 15 लाखांचे सोने आणि सुमारे 56 लाखांची रोकड आढळून आली. बॅगेतील घबाड पाहून रेल्वे पोलिसही चक्रावून गेले.
आयकर विभागाच्या टीमने 500 रुपयांच्या 11 हजार 200 नोटा असा एकूण 56 लाखांची रोख रक्कम आणि 1 कोटी 15 लाख 16 हजार किंमतीचे सोने असा एकूण 1 कोटी 71 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
















