जळगाव – सेवा आणि आर्थिक क्षेत्रात युवा पिढीसाठी मोठ्या संधी आहेत. या संधीचा योग्य लाभ घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी योग्य गुंतवणूक करा असा सल्ला आर्थिक सल्लागार उमंग मेहता यांनी विद्यार्थ्यांना दिला. गोदावरी आयएमआर महाविद्यालयात स्पार्क २०२० वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
गोदावरी आयएमआर महाविद्यालयातर्फे आयोजीत स्पार्क २०२० च्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. निलीमा वारके, प्रा. एम.के. गोडबोले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. प्रशांत वारके यांनी उमंग मेहता यांचे स्वागत केले. संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी प्रास्ताविकातुन मार्गदर्शन करतांना सांगितले की, वार्षिक स्नेहसंमेलनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास बळावतो, स्टेज डेअरींग वाढते असे सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आर्थिक सल्लागार उमंग मेहता यांनी सांगितले की, शेअर बाजारात गुंतवणूक करतांना कंपनीची पुर्ण माहिती घेऊन योग्य ते संशोधन करून गुंतवणूक केली पाहीजे. भविष्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक फायदेशीर आहे. एमबीए झाल्यानंतर तुम्हाला नोकरी सोबत स्वत:साठी देखिल गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी एनआयएसएम सारखे अनेक कोर्स आहेत. हे कोर्स गुंतवणूकीसाठी उपयोगी पडतात. केवळ नोकरीच्या मागे न धावता आर्थिक सल्लागार, उद्योजकही बनु शकतात असा सल्लाही उमंग मेहता यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी उमंग मेहता यांच्या संवाद साधुन शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाला संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. निलीमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, प्रा. हेमांगी महाजन, प्रा. वैजयंती असोदेकर, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. समवृध्दी रडे, प्रा. जयश्री महाजन, प्रा. आफरीन खान, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दीपक दांडगे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.














