
धरणात २० हजार क्युसेक्सपर्यंत आवक वाढली
विसर्गाची आकडेवारी (क्युसेकमध्ये)
दि. २५ सप्टेंबर रात्री …. ५,०००
दि. २६ सप्टेंबर
पहाटे ५.३० वाजता … १०,०००
सकाळी ९ वाजता … १२,५००
सकाळी ९.३० वाजता … १५,०००
सकाळी ११ वाजता … २०,०००
रात्री ८ वाजता … १०,०००
गिरणा काठ अॅर्लटवर
धरणातील विसर्ग एकूण ३० हजार क्युसेकपर्यंत पोहचल्याने गिरणेने रौद्ररूप धारण केले आहे. गिरणा नदी दुथडी भरून वाहत असून पिलखोड येथील गिरणा नदीवरील पुलापर्यंत पाणी पोहचले होते. वाढता विसर्ग पाहता पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने गिरणा काठची पिलखोड, मेहुणबारे, वरखेडे यासह अन्य गावे हाय अॅलर्टवर आहे. गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन उप विभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी केले आहे. पिलखोड येथे वरच्या भागाकडून वाहत्या पाण्यातून वाहत आलेला एक मृतदेह अडकल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. परंतु, यानंतर पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने तेथूनही तो पुढे वाहून गेल्याची माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली.