Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खासगी बॅंकांत लाखभर पदे

najarkaid by najarkaid
February 29, 2020
in राज्य
0
खासगी बॅंकांत लाखभर पदे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – बँकांमध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँक, आरबीएल बँक आणि अॅक्सिस बँकेसह अर्धा डझन खासगी बँका पुढील आर्थिक वर्षात जवळपास लाखभर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी करत आहेत. प्लेसमेंट कंपनी ‘टीमलीज’च्या मते रिटेल कर्जांमधून बिगर वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) बाहेर आल्यानंतर खासगी बँका आपला बाजारहिस्सा वाढवण्याची तयारी करत आहेत. 

‘टीमलीज’च्या अंदाजानुसार देशभरात खासगी बँकांद्वारे शाखा बँकिंग प्रकारच्या व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची भरती होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून बँका आपले रिटेल कर्जांच्या वितरणात वाढ करण्याचे संकेत आहेत. ‘टीमलीज’चे उपाध्यक्ष आणि नोकरभरती प्रमुख अजय शहा यांच्या मते खासगी बँका रिटेल व्यवसायावर अधिक भर देत आहेत. त्यामुळे त्यांनी शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करण्यासाठी कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी आर्थिक वर्षात ३० टक्के अधिक नोकरभरती बँकांमध्ये होण्याची शक्यता आहे. नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांनाही यातून संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टीमलीज’च्या मते अनुभव आणि सोपवण्यात येणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांनुसार नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत दरमहा वेतन मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बँकांनी प्लेसमेंट कंपन्यांना आपल्या गरजेनुसार सूचना करण्यासाठी सुरुवातही केली आहे. पदवी प्राप्त केलेले तरुण या पदांसाठी अर्ज करू शकतात. एमबीए आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. शाखा प्रमुख, ऑपरेशन आणि सेल्स मॅनेजर आदी पदांसाठी कर्मचारी भरती होणार आहे.

कोटक महिंद्र बँक
खासगी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कोटक महिंद्र बँक आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १२ हजार ते १५ हजार नव्या नोकऱ्यांची निर्मिती करणार आहे. बँकेच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख सुखजित पसरिचा यांनी दिलेल्या माहितीनुसार रिटेल बँकिंगमध्ये केवळ वरिष्ठ पदांचीच भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर आणि अन्य सेवा आदी जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. या शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विशेष आणि सर्वसामान्य पदांचीही निर्मिती करून जागाभरती करण्याचा विचार चालू आहे.

एचडीएफसी बँक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँक पुढील आर्थिक वर्षात जवळपास ३० हजार नव्या नोकरदारांची भरती करणार आहे. एकूण नोकरभरतीपैकी बहुतांश नोकऱ्या रिटेलमध्ये असणार आहेत. पुढील आर्थिक वर्षात आरबीएल बँकही दोन हजार जणांची भरती करणार असल्याचे वृत्त आहे. चालू आर्थिक वर्षापर्यंत बँकेच्या शाखांची संख्या ४०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आरबीएल बँकेचे कार्यकारी संचालक राजीव आहुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेची रिटेल, ब्रँच ब्रँकिंग आणि कार्ड बिझनेसमध्ये वाढ होत असून, त्यामु‌ळे नोकऱ्यांच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.

अॅक्सिस बँक
खासगी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या अॅक्सिस बँकेमध्ये आगामी आर्थिक वर्षात ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. बँकेच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख राजकमल वेंपती यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेत कॅम्पस, एम्प्लॉयी रेफरल आदी माध्यमांतूनही नोकरभरती होते. बँकेमध्ये परंपरागत पदांव्यतिरिक्त डिजिटल बँकिंग आणि तंत्रज्ञानावर आधारित नोकरभरतीही करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महसूलमंत्र्यांनीच वाळू माफिया निर्माण केलेत: विखे-पाटील

Next Post

एकनाथ खडसेंचा सूर बदलला; फडणवीसांचं केलं कौतुक

Related Posts

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Next Post
एकनाथ खडसेंचा सूर बदलला; फडणवीसांचं केलं कौतुक

एकनाथ खडसेंचा सूर बदलला; फडणवीसांचं केलं कौतुक

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us