नवी दिल्ली : मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे दिसून येतेय. दरम्यान, जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोमवारीही भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दराने पुन्हा 52 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी सकाळी घसरण सुरू केली. एमसीएक्सवर सकाळी ९.०५ वाजता सोन्याचा फ्युचर्स भाव १५५ रुपयांनी घसरून ५१,७२१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. ही किंमत २४ कॅरेट शुद्ध सोन्याची आहे. यापूर्वी सोन्याचा दरही ५१,७२१ या दराने उघडण्यात आला होता.
चांदी घसरली
एमसीएक्सवर चांदीच्या फ्युचर्स किमतीतही व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच घसरण दिसून आली. सकाळी, एक्सचेंजमध्ये चांदीची फ्युचर्स किंमत 316 रुपयांच्या घसरणीसह 68,520 रुपये प्रति किलो होती. सकाळी चांदीचा भाव 68,511 वर उघडला होता, जो काही काळानंतर किंचित वाढीसह व्यवहार करत होता. मात्र, मागील व्यवहार दिवसाच्या तुलनेत त्यात घसरण दिसून येत होती.
जागतिक बाजारपेठेत वेगवान वाढ
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.28 टक्क्यांनी वाढून $1,948.80 प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीचा स्पॉट रेट 0.70 टक्क्यांनी वाढून $25.44 प्रति औंस झाला. जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम भारतीय बाजारावर लवकरच दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.
















