Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंच्या उमेदवारीचा तिढा!

najarkaid live by najarkaid live
September 25, 2019
in राजकारण
0
खडसेंच्या उमेदवारीचा तिढा!
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई- गेल्या तीस वर्षांपासून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे निवडून येत आहेत. मात्र यंदा ते निवडणूक लढवणार की नाही, याचा गुंता सुटलेला नाही. शिवसेनाही या जागेसाठी आग्रही आहे. गेल्यावेळी आमदार खडसे यांना तोडीची टक्कर देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यावेळीही इच्छुक आहेत. ऐनवेळी उमेदवार बदलतो की मग ‘युतीच्या नावानं चांगभलं’ होऊन ही जागा भाजपच्या वाट्याला येऊन खडसेंना दिलासा मिळतो हे लवकरच स्पष्ट होईल.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे सन १९९०पासून सलग सहावेळा मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर भाजपचा आणि खडसेंचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. विरोधी पक्षात असताना तब्बल ३० वर्षे खडसे यांनी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष केला. त्यानंतर फळे चाखण्याची वेळ आली, तेव्हा मात्र खडसेंच्या नशिबी ‘वनवास’ आला. भोसरी जमीन प्रकरण व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांच्याशी कथित संबधांच्या आरोपांवरून खडसे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर खडसेंकडे सरकारने जसे दुर्लक्ष केले तशा त्यांच्या मतदारसंघातील समस्याही प्रलंबितच राहिल्या आहेत.

मुक्ताईनगर मतदारसंघात रखडलेले सिंचन प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि रोजगार हे प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. १९९५ च्या युतीच्या सत्ता काळातही हे प्रश्न होते. आजही ते कायम राहिले आहेत. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर खडसे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र, महसूल खाते देऊन पक्षाने त्यांची बोळवण केली. वर्षभरातच कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. ‘क्लीन चिट’ मिळून देखील मंत्रिपदापासून ते वंचितच राहिले. खडसेंनी अनेकदा जाहीरपणे आपल्या मनातील खदखद व्यक्त करीत आपल्याच सरकारला, पक्षीय नेत्यांना घरचा आहेरही दिला. या सर्वांचा परिणाम म्हणूनच की काय, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सातव्यांदा आमदार खडसे यांना उमेदवारी मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, खडसे यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावाची चर्चा आहे. खडसे यांना मी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करावे लागले यातच सारे आले. जळगाव जिल्ह्यात भाजपच्या फळीत आता पालकमंत्री गिरीश महाजनांचे वर्चस्व दिसते. तिथे खडसेंना स्थान राहिलेले नाही.

गेल्या निवडणुकीत खडसेंना तुल्यबळ लढत देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटीलही खडसेंची कोंडी करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. अशा या चक्रव्यूहातदेखील खडसे बालेकिल्ल्यात पाय रोवून उभे आहेत. आमदार खडसे यांचा लढा विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांशीच जास्त दिसत आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्यात आले असता, खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत त्यांना विचारले होते. त्यावेळी त्यांनी खडसे राज्यात राहतात, की दिल्लीत जातात याचा निर्णय श्रेष्ठी घेतील असे सूचक उत्तर दिल्याने खडसे यांच्या उमेदवारीबाबत तिढा वाढला आहे.

सन २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेशी युती तोडण्याचा निर्णय खडसेंनीच जाहीर केला. तेव्हापासून शिवसेना खडसेंवर नाराज आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा निर्णय ऐनवेळी घेऊ, असे खडसेंनी एकदा म्हटले होते. मात्र, त्यांनीच निवडणूक लढवावी, असा समर्थकांचा आग्रह आहे. दुसरीकडे मुक्ताईनगरची जागा शिवसेनेला सोडण्याचे वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील करीत आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरच्या जागेबाबतदेखील अद्याप संभ्रम कायम आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, अनेक वर्षांपासून पराभवच होत आहे. त्यामुळे आघाडीकडून फारशा हालचाली न होता. निवडणुकीची औपचारिकता पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. येथून वंचित बहुजन आघाडी व संभाजी ब्रिगेडही यंदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.

संभाव्य उमेदवार

भाजपकडून एकनाथ खडसे, त्यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद तराळ हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

हे प्रश्न अद्यापही कायम

या मतदारसंघात तीन तालुक्यांतील १७४ गावांचा समावेश होतो. त्यात सावदा ते रावेरचा पट्टा केळी उत्पादकांचा पट्टा आहे. उर्वरित पट्ट्यातील प्रमुख पीक कापूस आहे. परंतु, प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने रोजगार नाही. जागतिक दर्जाच्या केळीचे उत्पन्न येथील शेतकरी घेतात. परंतु, त्याच्या निर्यातीसाठी सक्षम यंत्रणा नाही. मुक्ताईनगरजवळून पूर्णा नदी वाहते. तरीही या शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. गेल्या वीस वर्षांत वारंवार आश्वासने देऊनही मुक्ताई उपसा सिंचन, कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर उपसा सिंचन योजना पूर्ण झालेली नाही. बोदवड तालुक्यातही पाणीप्रश्न गंभीर असून, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उद्योगधंद्यांचाही अभाव दिसत आहे.

मतदारांची संख्या
पुरुष .. १ लाख ४९ हजार ५६०
स्त्री .. १ लाख ४० हजार ०७६
एकूण .. २ लाख ८९ हजार ६३७

२०१४ विधानसभेतील मतदान
एकनाथ खडसे .. भाजप .. ८४,९१३
चंद्रकांत पाटील .. शिवसेना .. ७५,६१७
अरुण पाटील .. राष्ट्रवादी .. ६,४७९

२०१९ लोकसभा निवडणूक
मतदारसंघातून मताधिक्य
भाजप .. १ लाख ७ हजार ३८३
काँग्रेस .. ४७ हजार ५३०

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवस्मारक प्रकल्पामध्ये अनियमितता, भ्रष्टाचार; न्यायालयीन चौकशी करावी – काँग्रेस, राष्ट्रवादीची संयुक्त मागणी

Next Post

आदर्श आचारसंहितेचे प्रत्येक विभागाने काटेकोरपणे पालन करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Related Posts

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
Next Post
आदर्श आचारसंहितेचे प्रत्येक विभागाने काटेकोरपणे पालन करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

आदर्श आचारसंहितेचे प्रत्येक विभागाने काटेकोरपणे पालन करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

ताज्या बातम्या

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

July 27, 2025
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya – आजचे राशीभविष्य 27 जुलै 2025

July 27, 2025
Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us