चाळीसगाव-चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
याबाबत त्यांनी पंतप्रधान मंत्री, कार्यालय दिल्ली व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे अभियंत्यांनी खडकी सीम च्या शेतकऱ्यांना मिळणारे पाणी, डाव्या कालवा पाटचारी क्र.९व१० वरील गेट हे कॉंक्रीट टाकून बंद केले आहे, त्यामुळे शेतकरी जवळपास १०ते११ वर्षापासून डाव्या कालवा च्या पाण्यापासून वंचित आहेत.
या विभागाच्या अधिकाऱ्यांन विषयी व पाटचारी कर्मचार्यांन विषयी संबंधित विभागांना अनेक तक्रारी केल्या असून अध्याप त्या तक्रारींचा कुठलाही पद्धतीने निपटारा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आज पावेतो खडकी सीम परिसरातील शेतकऱ्यांवर पाणी असून मिळत नाही म्हणून अन्याय होत आहे. आणि ह्या अन्यायाची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर आम्ही नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे , या पुढेही अनेक पद्धतीचे तीव्र आंदोलन करण्यात येतील असेही सांगितले .
या निवेदनाच्या प्रती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जळगाव चे खासदार उन्मेश पाटील, मा .जिल्हाधिकारी साहेब जळगाव,मा. तहसीलदार साहेब चाळीसगाव, मा. कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चाळीसगाव, यांना पाठवले आहे या निवेदनावर चंदू महादू पाटील, निंबा देवराम पाटील ,रणजीत भानुदास पाटील ,भालचंद्र नारायण पाटील ,गजानन भगवान पाटील नितीन युवराज कुवर, कुणाल श्रीराम जठार, किशोर भास्कर जठार, दिलीप नथू पाटील ,गोकुळ चंद्रभान पाटील ,साहेबराव महादु पाटील, अशा अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत,