जळगाव, (प्रतिनिधी) – नुकतेच जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, भुसावळ, रावेर, जामनेर, येथील 47 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतांना नुकत्याच प्राप्त झालेल्या 47 कोरोना संशयितांची नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याला दिलासादायक बातमी मिळाली आहे.