Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्यावर कडक उपाययोजना राबवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना

najarkaid live by najarkaid live
May 8, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, – कोरोना विषाणू संसर्ग जगभर थैमान घालत असताना बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) च्या सीमेवरील रावेर, बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात अद्यापपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही याबद्दल सर्व तालुक्यांच्या यंत्रणांचे कौतुक करतांनाच यापुढेही या तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होता कामा नये. याकरीता जिल्हा व राज्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणी करावी. अशा सुचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्यात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्याच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, मुक्ताईनगर तहसीलदार शाम वाडकर, बोदवड तहसीलदार रवींद्र जोगी, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, मुक्ताईनगर मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, बोदवड मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ योगेश राणे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांचेसह मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील महसूल, आरोग्य विभाग, कृषी विभाग, नगरपंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, नागरीकांनी स्वत:ची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी. कोणीही लॉकडाऊनमध्ये विनाकारण रस्त्यांवर फिरु नये. जे नागरीक मास्क वापरणार नाही त्यांना दंड करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्यात. कोरोनावर मात करण्यासाठी निधीची कमतरता नाही. त्यामुळे यंत्रणेला आवश्यक असणाऱ्या बाबी तातडीने उपलब्ध करुन देवू. परंतु या तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून घ्यावी. या तालुक्यांमधील दवाखान्यांमध्ये लागणारे साहित्य तातडीने उपलब्ध करुन देण्यात येईल. पोलीसांच्या मदतीला होमगार्ड उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्याला जे होमगार्ड उपलब्ध झाले आहे. त्यामधून या तालुक्यांसाठी पाठविण्यात येतील. यावेळी पालकमंत्री यांनी पाणीटंचाई, खरीप हंगामासाठी लागणारी बीयाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता याबात कृषि अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. बीयाणे खरेदीसाठी गर्दी होवू नये याकरीता शेतकऱ्यांना बीयाणे बांधावर देण्याबाबतचे नियोजन करा. पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील नागरीक अडकून पडलेले आहे. त्यांचेसाठी बसेस सोडण्याचे नियोजन शासन करीत असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी रेशनवरील धान्य वाटपात कोणीही वंचित राहू नये, केळी वाहतुक करणाऱ्या वाहनांना पासेस उपलबध करुन मिळावे, डॉक्टरांना आवश्यक सुविधा मिळण्याची तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तालुक्याच्या काही भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास विहिर अधिग्रहण व्हावे, जुन्या पाणीपुरवठा योजनांची कामे सुरु व्हावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्याबाबत सुचना केल्यात.
यावेळी कृषि विभागाच्यावतीने शेतकरी गटांमार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना बीयाणे, खते शेतकऱ्यांच्या बांधावर पुरविण्यात येत आहे. याचा शुभारंभ पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळातील आढावा बैठकीत कोरोना संसर्ग उपाययोजनांचा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

Next Post

आज दिवसभरात पंचवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोरोना उपचारावर प्लाझ्मा थेरपी उपचार काय आहे जाणून घ्या

आज दिवसभरात पंचवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

February 23, 2026
NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us