Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“कोरोणा कक्षाच्या गार्ड ड्युटी निमित्त” अनुभव शेअर करणारे पोलीस नाईक विनोद अहिरे काय म्हणतात पहा…

najarkaid live by najarkaid live
April 29, 2020
in जळगाव
0
कोरोना उपाय योजनेसाठी पोलीस विनोद अहिरे यांनी मुख्यमंत्री निधीत दिले एक महिन्याचे वेतन !
ADVERTISEMENT
Spread the love

नमस्कार मित्रांनो मी पोलीस नाईक विनोद अहिरे, जळगाव  दि. २२/४/२० रोजी “कोरोणा कक्षाच्या गार्ड ड्युटी निमित्त” ही माझ्या अनुभवांची पोस्ट फेसबुक शेअर केली होती. त्या पोस्ट ला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की, अनेकांनी परस्पर शेयर केली आणि कमेंट्स मधे अक्षरशः कौतुकाचा पाऊस पडला.ते म्हणतात ” मी आपल्या प्रेमाने भारावलो”…

पुढे ते आपल्या पोस्ट मध्ये लिहतात…  मी “कोरोणा कक्षाच्या गार्ड ड्युटी निमित्त”  माझ्या अनुभवांची पोस्ट सोबत माझा मोबाईल नंबर टाकल्या मुळे ह्या तीन दिवसात तीनशे ते चारशे फोन, बारा वर्षाच्या लहान मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांचे फोन आले, प्रत्येक जण आस्थेवाईकपणे विचारपूस करत होते. सगळ्यांच्या बोलण्यात वारंवार हेच येत होते की, काळजी घ्या. मी माझ्या अठरा वर्षां च्या सर्व्हिस मधे ऐका सर्वसाधारण पोलीस कर्मचारी बद्दल इतका जिव्हाळा इतकं प्रेम, वात्सल्य कधीच अनुभवले नव्हते, त्यामध्ये प्रतिनिधिक स्वरूपात नावे घ्यायची म्हटलं तर मुंबईच्या ग्रेसी मंडल, छाया कासरे, प्रिया पाटील, महेश खैरनार सोलापूरच्या राणी ताई, दिल्लीचे दिलीप शर्मा, पत्रकार दिलीप जैन, नरेश बागडे, सुनील भोळे यांनी तर लगेच त्यांच्या मराठी ७ ऑनलाईन पोर्टल वर बातमी देखील टाकली, नजरकैदचे संपादक प्रवीण सपकाळे तर म्हणाले की, तुम्ही पोलीस न होता संपादक व्हायला पाहिजे होते. आम्ही संपादक सहसा वेळ नसल्याने फेसबुक वरची येवडी मोठी पोस्ट वाचत नाही, पण तुमचे अनुभव वाचायला सुरुवात केली तेव्हा अक्षरशः अंगाला शहारे येत होते आणि आपसूकच पूर्ण वाचलं गेलं आणि त्यांनी लगेच त्यांच्या पोर्टल वर बातमी टाकली आणि लगेच पोलीस प्रवाहचे जितेंद्र चौधरी यांनी देखील बातमी टाकली आणि फोन येण्याचा ओघ अधिकच वाढला, पुण्याचे अभिजित अधाव यांनी तर लॉग डाऊन नंतर स्पेशल नॉनव्हेज खाण्याचे परिवारासह निमंत्रण दिले, राज दीक्षित यांनी तर माझा बँक अकाऊंट नंबर मागितला आणि म्हणाले की, सर तुम्ही ऐवडा जीव धोक्यात घालून आमच्यासाठी ड्युटी करीत आहेत तर माझ्या परीने काय द्यायचे ते देतो तुम्ही फक्त तुमचा बँक न. द्या मी त्यांचे आभार मानून नम्रपणे नकार दिला आणि त्यांना म्हणालो की, साहेब मला तर पगार आहे. आणि लॉग डाऊन नंतर आर्थिक आणीबाणी जरी लागली तरी शासन पोलिसांचे पगार बंद करणार नाही, कारण या काळात पोलिसांचे काम अधिक वाढते! तुम्हाला जर मदतच करायची असेल तर तुमच्या परिसरातील जो झोपडपट्टी वर्ग असेल त्यांना पैसे न देता जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून द्या जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर जी सामाजिक स्वस्था त्या भागात काम करत असेल तर त्यांना द्या आणि खरोखरच तुम्ही दिलेली मदत गरजुंपर्यंत पोहचते आहे की नाही याचा पाठपुरावा करा आणि तेही शक्य नसेल तर सरळ मुख्यमंत्री निधीत जाउद्या त्यांनाही माझे म्हणणे पटले तरी शेवटी ते बोललेच की, तुमच्यासाठी काय पाठाऊ मी त्यांना पुन्हा नम्रपणे म्हणालो तुम्हाला द्यायचंच असेल तर कोरोणाचा प्रादुर्भाव संपल्यावर पुस्तकं पाठवा आणि नेमका कालच जागतिक पुस्तक दिवस होता. ते हो म्हणाले; मला पुस्तकं वाचण्याचा जाम शौक आहे. आणि माझं मत देखील असं आहे की, ज्या प्रमाणे आपली पोटाची भूक शमिण्यासाठी अन्नाची गरज असते त्याच प्रमाणे आपली वैचारिक भूक भागवण्यासाठी पुस्तकाची गरज असते, आणि वाचनाने जी वैचारिक मेजवानी मिळते त्याचे समाधान काही वेगळेच असते. आणि ज्याला वैचारिक भूक लागत नाही, त्याला माणूस म्हणून घेण्याचा काहीएक अधिकार नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेच आहे की, तुमच्या जवळ जर दोन नाणी असतील तर तुम्ही ऐका नाण्याची भाकर घ्या आणि दुसऱ्या नाण्याचे पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल.. त्यानंतर लगेच चार वाजता फोन आला हालो मी, अनिल पाटिल, देशदूत संपादक, मी म्हणालो बोला अनिल दादा ते म्हणाले की, मी तुमची अनुभवाची पोस्ट वाचली खरोखरच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. मी म्हणालो ते तर आमच्या कर्तव्याचा एक भागच आहे. पण तुमच्या सारखे सकारात्मक विचारांचे लोक जेव्हा कौतुक करतात त्यामुळे अजून उत्साह वाढतो आणि काम करण्याची प्रेरणा मिळत असते. त्या नंतर ते म्हणाले की, आम्ही कोरोना विशेष पुरवणी काढतो आहे. आणि तुमची अनुभांची बातमी देखील छापतो आहे. तुमचा फोटो सेंड करा, अनिल दादा जरी माझे परिचयाचे होते तरी ऐका नामांकित वृत्तपत्राचे ते संपादक होते आणि संपादक म्हणून मला पहिल्यांदाच फोन आला होता. त्यांना सर्व माहिती पाठवली चहा घेतला रात्री ड्युटीला जायचं म्हणून पोलीस मुख्यालयात सनितायजर घ्यायला गेलो पण भांडार पाल निघून गेल्यामुळे मीच मेडिकल वरून घेतले घरी आल्यावर पत्नीला म्हटलो लवकर जेवण वाढ कारण आठ वाजता ड्युटीवर जायचे होते. पण ती म्हणाली थोडा वेळ लागेल मग उशीर होण्यापेक्षा सकाळचं काही आहे का? ती म्हणाली हो खीर आहे. ऐक वाटी खीर खाऊन नेहमी प्रमाणे युनिफॉर्म सह कोरोना विरुद्ध लढण्याची युद्ध सामुग्री घेतली आणि “कोरोना” कक्षा जवळ आलो आणि नेहमी प्रमाणे “भय इथले संपत नाही” या पारश्वभूमीवर च ड्युटी केली आणि ड्युटी संपली घरी आल्यावर नेहमी प्रमाणे बंडूला चाहूल न लागता सरळ बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ केली आणि त्यानंतर थोडी झोप घेऊ म्हणतो तर पण झोप कसली लागते, बातमीच येणार होती म्हणून सरळ गाडीला किक मारून स्टँड वर पेपर खरिदी करण्यासाठी गेलो. देशदूत पेपर घेतला, देशदूत ने “कोरोना युद्धातील सैनिकांना सलाम” ही स्पेशल आठ पानांची पुरवणी काढली होती. पहिलं पान बघितलं बातमी नव्हती, दुसरं पान बघितलं बातमी नव्हती, तिसऱ्या पानावर पण नाही असे करत पूर्ण आठ पाने पुनः पुनः पहिली पण बातमी दिसली नाही, मनाशीच प्रश्न केला की, जागा नसणार म्हणून बातमी लावली नसणार आणि असं ही सर्वसाधरण पोलीस कर्मचाऱ्याची चांगल्या कामाची बातमी कुठे लागणार? आणि अनिल दादांवर रागच आला कारण मी घरी सांगितले होते की, माझी बातमी येणार आहे. तरी पण पेपर घेतला म्हणून मुख्य पेपर शेवटच्या पानापासून कोपाऱ्या कोपऱ्यात पाहायला सुरवात केले पान आणि बघत बघत संपादकीय पानावर नजर जाताच आचार्य चां धक्काच बसला माझी बातमी चक्क संपादकीय पानावर “योद्धा म्हणून कोरोना कक्षाची ड्युटी स्वीकारली” या शीर्षकाखाली अर्धे पानभर बातमी छापून आली होती. मी नेहमीच पेपर वाचतांना जर कमी वेळ असेल तर मी फक्त संपादकीय पानावरचे लेख वाचत असतो, कारण प्राप्त परिस्थितीवर मोठमोठ्या विचारवंताचे चिकित्सक लेख त्या पानावर येत असतात. आणि आज चक्क माझ्या अनुभवांची बातमी तेही अर्ध पान भरुन आलेली होती. आणि ऐका क्षणात अनिल दादा बद्दलचा गैरसमज गळून पडला आणि त्यांच्या बद्दलचा आदर मनामध्ये अधिकच वाढला असच बऱ्याच वेळा आपण आपल्या अल्लड पणामुळे दुसऱ्या बद्दल गैरसमज करून क्लेश करू लागलो. आणि थोड्या वेळात घरी आलो तर घरच्यांनी सांगितलं की, खुप सारे फोन येत आहे. आणि परत फोन आला धुळ्याचे भिमराव मोरे म्हणाले की, साहेब आताच तुमची बातमी देशदूत पेपर मधे वाचली तुम्ही अगदी खरं सांगितलं आहे. माझी मुलगी शोभा ही देखील नर्स आहे. आणि तिच्या सुद्धा भावना अश्याच प्रकारच्या आहेत. त्यानंतर शेडूर्णीचे बडगुजर यांनी तर कोरोना प्रतिबंधासाठी गुळवेल ची मुळे शिजवून खाण्याचा सल्ला दिला अशे अनेक कौतुकाचे फोन देशदूत पेपर मुळे अले प्रत्येकाला मी हेच सांगितले की, कृपा करून घराबाहेर पडू नका आणि मी जी चिमणीची पोस्ट टाकली आहे ती जयहो सिनेमा प्रमाणे वाटल्यास आपल्या नावाने फॉरवर्ड करा जनेकरून चांगले प्रभोदन होईल आणि कोरोना विरुद्ध चे युद्ध आपणाला जिंकता येईल आणि तुमची पण चिमणीची भूमिका बजावली जाईल. मी अगदी मनापासून अनिल दादा आणि देशदूत दैनिक आणि नजरकैद , मराठी ७, पोलीस प्रवाह आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो की, ऐका पोलिसांच्या कोरोणा कक्षात ड्युटी करतांना काय भावना असतात त्याचा तुम्ही प्रचार आणि प्रसार केलात.
धन्यवाद……
जयहिंद, जयमहाराष्ट्र

आपला
विनोद अहिरे, दक्षता नगर, पोलीस मुख्यालय जळगाव
9823136399

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लॉकडाऊनमुळे कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे आगारातून 70 बसेस रवाना

Next Post

भुसावळ तालुका रेशन वितरण कमिटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

Related Posts

Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 29, 2025
Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

July 29, 2025
Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

July 28, 2025
jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

July 27, 2025
Next Post
भुसावळ तालुका रेशन वितरण कमिटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

भुसावळ तालुका रेशन वितरण कमिटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

ताज्या बातम्या

Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

July 29, 2025
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

July 29, 2025
क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us