Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल- गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले संकेत

najarkaid by najarkaid
April 21, 2021
in राज्य
0
कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल- गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले संकेत
ADVERTISEMENT

Spread the love

सांगली दि. 21 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन निर्बंध अधिक कडक करणार आहे. राज्य शासन लागू करत असलेलल्या निर्बंधाची अंमलबजावणी 100 टक्के कडकपणे करुन दिलेल्या सूचनांचे ततोतंत पालन करा, त्यासाठी अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये बंदोबस्ताची सर्वतोपरी तयारी करण्यात यावी. अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण), शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनास दिल्या.

पोलीस अधिक्षक कार्यालयातील बैठक सभागृहात कायद्या व सुव्यवस्था, जिल्ह्यात लागू असलेली संचारबंदी आढावा व पोलीस दलाचा कामकाजाचा आढावा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी घेतला यावेळी पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक सर्वश्री किशोर काळे, कृष्णांत पिंगळे, अश्विनी शेंडगे, अंकुश इंगळे, अशोक वीरकर, नवले, अजित टिके उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल यासाठी पोलीस दलाची बंदोबस्त, नाकेबंदी इत्यादी संदर्भाची तयारी असली पाहिजे. केंद्र शासनाने 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना लसीकरण देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्याता नाकारता येत नाही. गर्दी होऊ नये याबाबतची तयारीही पोलीस प्रशासनामार्फत करण्यात यावी. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग येत असतील अशा पोलीस ठाण्यांनी अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलीस वेलफेअर फंडामधून अधिकाऱ्यांना छावणीच्या ठिकाणी फुड पॅकेट, पाणी, प्राथमिक आरोग्याच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे सांगून गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई म्हणाले, रात्रीच्या बंदोबस्तासाठी महिला कर्मचाऱ्यांना नेमण्यात येऊ नये त्याचबरोबर 50 वर्षावरील पोलीसांना बंदोबस्त न देता कार्यालयीन काम, पोलीस स्टेशन मधील काम या ठिकाणी नेमणूक देण्यात यावी.

पोलीस यंत्रणा समाजामध्ये कायद्या व सुव्यवस्था ठेवण्याचे काम करत असल्याने अहोरात्र काम करत असते. सामान्य जनतेमध्ये त्यांना फिरावे लागते यामुळे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असते यामुळे आरोग्याबाबतही पोलीस दलाने दक्षता घ्यावी. कोरोना उपचारासाठी पोलीस वेलफेअर फंडातून पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड सेंटर उभारता येईल का याबाबत उपाययोजना करावी. असे सांगून गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई म्हणाले, पोलीस दलातील प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. पोलीस दलाला सुरक्षा कवच विमा लागू करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नागरिकांनी मास्कचा, वेळोवेळी सॅनिटायझरचा, सुरक्षित अंतर याचे पालन केले पाहिजे याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहनही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.

पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यावेळी म्हणाले, सांगली पोलीस दलाच्या वतीने 144 कलामाची शासनाच्या आदेशानूसार अंमलबजावणी करण्यात येत असून प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस दलात आतापर्यंत 85 टक्के अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला असून 61 टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांना दुसरा डोस ही दिला आहे. उर्वरितांना तातडीने लसीकरण करुन घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. असे सांगून जिल्ह्यात सुरु असलेल्या कोविड बंदोबस्ताची अंमलबजावणी, गुन्हांचा आढावा, ब्रेक द चेन अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा आढावा यावेळी सादर केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऑक्सिजन गळती घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर ; उच्चस्तरीय चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Next Post

राज्यातील ऑक्सिजन तुटवड्यावर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपेंची माहिती…

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन संपला… काय म्हटले वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे

राज्यातील ऑक्सिजन तुटवड्यावर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपेंची माहिती...

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us