जळगाव – न्यायालयीन कामकाजानंतर पुन्हा कारागृहात सोडतेवेळी राकेश वसंत चव्हाण वय 28 रा. धार रोड अमळनेर, याने कर्मचार्याच्या हाताला हिसका देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पाठलाग करुन कर्मचार्यांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले होते. वैद्यकीय तपासणीत संशयित चव्हाण याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले असून तो दारु कशी पिला, त्याला कोणी पाजली याप्रकारे चौकशी करण्यात येत असून यात गार्ड तिघा पोलीस कर्मचारी दोषी असल्याचे सिध्द झाल्यास तिघांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली आहे.














