जामनेर-जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथील पत्रकार सागर लव्हाले यांना आज सकाळी सुमारे ९ वाजता केकतनिभोंरा ग्रा.प सरपंच पति दीपक पाटिल याने मारहाण केली असून सदर गावातील विज उप केंद्राचे सरक्षण भिंतीचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे बातमी का लावण्यात आली याचा राग आलेला म्हणुन सदर पत्रकारास मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकि दीली . या संदर्भात पत्रकार सागर लव्हाले याने जामनेर पोलिस स्टेशनमधे तक्रार दिली असुन दीपक पाटिल यांच्यावर भा.द.वी.323,504,506अदाखल पात्र प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . पत्रकारांवर होत असलेल्या वांरवांर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना निषेर्धात जामनेर पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार व जामनेर पो.स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटिल यांना निवेदन दिले.