नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षेच राहणार आहे. निवृत्तीचं वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. सध्या तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.
१ एप्रिल २०२० पासून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात काही बदल करू शकतं, असं वृत्त होतं. त्यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हा संभ्रम दूर केला आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत लोकसभेतच लेखी उत्तरात माहिती दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे साठ वर्षे राहील हे स्पष्ट झालं आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ६० वरून ५८ वर्षे करण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, असं सिंह यांनी सांगितलं.















