Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

जैन हिल्स ला आजपासून फालीचे अकरावे अधिवेशन सुरु; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

najarkaid live by najarkaid live
April 28, 2025
in जळगाव
0
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)– शेती परवडत नाही असे म्हटले जाते ही नकारात्मकता दूर झाली पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतुन मिळते फक्त नियोजन करून तंत्रज्ञानासोबत शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणे करून शेती परवडेल, लहानपणापासूनच शेतीविषयी आवड असेल तर यात यशस्वी होता येते. मजूरांची टंचाईसह अन्य समस्या निर्माण होत असतात, मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढावे लागते त्यासाठी जैन इरिगेशन प्रयत्न करते असे मनोगत फाली सुसंवादामध्ये सहभागी शेतकऱ्यानी व्यक्त केले.
भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अकरावे अधिवेशनची आज जैन हिल्सला सुरवात झाली. शेतकऱ्यांच्या सुसंवादात, शेतीविषयी समाजात उदासिनेतवर जास्त चर्चा केली जाते‌, परंतु सकारात्मक बाबींवर चर्चा केली पाहीजे फाली उपक्रमात ते दिसते.
प्रत्येकाला रोज अन्न लागतेय त्यामूळे शेतीला भविष्य आहे फक्त ती उद्योजकीय दृष्टीने त्याकडे बघीतले पाहिजे. संकटात सुध्दा सोल्यूशन मिळते तसे प्रयत्न केले पाहिजे. बाजारातील मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले पाहिजे. हमी भावाची शेती परवडत आहे. यासाठी करार शेती महत्त्वपूर्ण आहे. कृषिक्षेत्राला नकारात्मकतेतुन सकारात्मक दिशा देण्याचे काम जैन हिल्स वरून होत आहे. प्रत्येक पावलावर समस्या आहे मात्र त्यासोबत त्याचे उत्तर ही मिळत असते. शेतीविषयी सर्वतोपरी तंत्रज्ञानाची माहिती ठेवली पाहिजे. असा केळी, पपई, कांदा, हळद, कापूस, टोमॅटो, टरबूज, मका, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी सुसंवाद साधला. बाजारपेठ, मार्केंटिग, फ्रुटकेअर व्यवस्थापन, निर्यातक्षम उत्पादनासाठी घ्यायची काळजी, हवामानातील  बदल, केळी उत्पादनाचे नफ्याचे गणिते, शेती आणि शिक्षणासह जैन तंत्रज्ञान यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. निलेश पाटील (जामनेर), चंद्रकांत रामदास सोनाळकर (पहुर), छोटुराम तुकाराम पाटील (वाकि ता. जामनेर), पद्माकर जगन्नाथ पाटील (तराळि ता. चोपडा), गोविंदा गोळे बोदवड या शेतकऱ्यांनी भविष्यातील शेतीविषयी मार्गदर्शन केले. जान्हवी नंगेश्वर, लक्ष्मी पाटील, प्रणव शिंदे, प्रगति सांगोळे, नंदिनी दहिकर, राशि मराठे, संतोष सावंत, आरव बंडि, लावण्या पाटील, श्रेया बरकले, मंदिरा शिंदे या फाली विद्यार्थ्यांनी लिड केले. जुली पटेल, रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
पहिल्या टप्प्यातील पहिला दिवस
फाली उपक्रमात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, व मध्यप्रदेश राज्यातील 500 विद्यार्थी व फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील परिश्रम, जैन हिल्स शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्र, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू,  टिश्यू कल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्युकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.
अधिकारी व शेतकरी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची गट चर्चा
दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे गट चर्चा झाली यामध्ये जैन इरिगेशनचे तज्ज्ञ डॉ. अनिल ढाके, अतिन त्यागी, संजय सोनजे, जगदीश पाटील हे तसेच डॉ. बिभूति पटनाईक (स्ट्रार ॲग्री), सुरज पानपट्टे (ॲग्री वेश), अरूण श्रीमालि(प्रोमेप्ट), शैलेंद्र जाधव, अंकिता (आयटी सि), वैभव भगत (उज्जवन), डॉ.विनोद चौधरी (गोदरेज फूड), त्याच प्रमाणे यावल तालुक्यातील राजोरा येथील प्रगतशील शेतकरी दिपक सतिश पाटील, राहुल अरूण पाटील (दापोरा- बु-हाणपूर) सहभागी झाले होते.
 फाली चा 11 वा वर्धापन दिन
फाली कार्यक्रमाचा आज 11 वा वर्धापन दिन होता या निमित्ताने फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितित केक कापण्यात आला.
आज इनोव्हेशन आणि व्यवसाय योजनांचे सादरीकरण
फाली 11 मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

Next Post

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

Related Posts

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
Next Post
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

ताज्या बातम्या

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Load More
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us