पाचोरा ;- कुरंगी येथील सरपंच पदाची आज निवड करण्यात आली .येथील सरपंच दिपक मोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सुरेश कोळी (माध्यमिक शिक्षक )यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासुन कोळी समाजाच्या पहील्याच सरपंचपदी सुरेश कोळी यांची वर्णी लागली आहे. या सरपंच पदाचा मान माजी आ.दिलीप वाघ यांनी मिळवून दिल्याबद्दल कोळी समाज बांधवानी दिलीप वाघ यांचे अभिनंदन केले.तसेच सर्व ग्रा.प. सदस्याचे आभार कोळी समाजबांधवानकडुन मानण्यात येत आहे. निवडणुक निर्णयअधिकारी नांद्रा मंडळाधिकारी रमेश मोरे यांनी काम पाहीले .कुरंगीचे नवनिर्वाचीत तलाठी मयुर आगरकर ग्रामसेवक श्री परखाड ,माजी सरपंच गजानन पवार, दिपक मोरे, गुलाब पाटील, आमिन शेख ,सुदाम पाटील ,इंदुबाई सोनवणे, मंगलाबाई भोई, वंदणाबाई पाटील ,उषाबाई पाटील, कमलबाई भिल्ल ,मधुकर पाटील ,विठ्ठल पाटील, पांडुरंग कोळी, कोतवाल विजय कोळी यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.