Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचे ८५ टक्के काम पूर्ण; राज्य सरकारची माहिती

mugdha by mugdha
January 2, 2024
in राज्य
0
कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचे ८५ टक्के काम पूर्ण; राज्य सरकारची माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, कुणबी प्रमाणपत्र तपासण्याची ८५ टक्के कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती राज्य सरकारतर्फे मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना देण्यात आली.मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, समितीचे सदस्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे पाटील, शंभूराज देसाई, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती मारोती गायकवाड, विविध विभागांचे सचिव त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. ही बैठक समाप्त झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत त्यांना निर्णयांची माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यात कुणबी नोंदी असलेले उर्दू मोडीतील दाखले तपासले जाणार आहेत. याबाबत बैठकीत चर्चा झाली. दुसरा विषय म्हणजे मागासवर्ग आयोगाला राज्यभरातून मनुष्यबळ उपलब्ध करून देत मदत करण्याबाबत निर्णय झाला. तसेच या बैठकीत क्यूरेटिव्ह पिटीशन संदर्भात चर्चा करण्यात आली. हैदराबादसोबत कुणबी नोंदीसाठी पत्रव्यावहार झाल्याची माहिती जरांगे यांना देण्यात आली. शिंदे समिती हैदराबाद आणि तेलंगणात जाऊन पुन्हा काम करणार आहे. कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘सगेसोयरे’ शब्दाचा अर्थ चुकीचा लावला – जरांगे

मी उपोषण सोडताना उदय सामंत, अतुल सावे, बच्चू कडू, धनंजय मुंडे, संदिपान भुमरे यांच्यासह न्यायमूर्ती गायकवाड, न्यायमूर्ती सुक्रे हे उपस्थित होते. ज्याची नोंद सापडेल त्याच्या परिवाराला जात प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. १८०५ ते १९६७ आणि १९६७ ते २०२३ पर्यंतच्या नोंदी तपासण्याचे ठरले होते. ज्याची नोंद सापडली, त्याचे सगेसोयरे असे ठरले होते. परंतु, ‘सगेसोयरे’ या शब्दाचा अर्थ चुकीचा लावला गेला, असे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. राज्यातील काही तालुक्यांमध्ये कुणबी नोंदी तपासणीचे काम योग्यरित्या होत नाही. राज्य सरकारने समिती नेमली, पण खालचे अधिकारी दाखले देत नाहीत. काही ठिकाणी निरंक अहवाल दिले गेले. आंतरवाली सराटीमध्ये आमच्या लोकांनी मार खाल्ला, पण त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. दोन दिवसांमध्ये गुन्हे मागे घेतो असे सांगितले होते. परंतु, चार महिने झाले, तरी गुन्हे मागे घेतले गेले नाहीत, अशी तक्रार जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Spread the love
Tags: #मराठा आरक्षणKunbi CertificateManoj Jarange PatilMaratha Reservationकुणबी प्रमाणपत्रमनोज जरांगे पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान ; संपूर्ण उदिष्ट,पारितोषिक,स्वरूप आणि नियम,अटी जाणून घ्या

Next Post

५०० वर्षे बसून कुराण-ए-करीमचं पठण केलं…तरुणांनो आपण आपली मशीद गमावली ; खा.ओवैसी यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
५०० वर्षे बसून कुराण-ए-करीमचं पठण केलं…तरुणांनो आपण आपली मशीद गमावली ; खा.ओवैसी यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

५०० वर्षे बसून कुराण-ए-करीमचं पठण केलं...तरुणांनो आपण आपली मशीद गमावली ; खा.ओवैसी यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us