भडगाव, (प्रतिनिधी) – येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेमार्फत आज मुख्यमंत्री सहायता निधी करिता एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची मदत करण्यात आली.
राज्यातील कोरोना आजाराच्या पाश्वभूमीवर गरजू रुग्णांना मदतीसाठी संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या शुभहस्ते शासकीय स्तरावर पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे नायब तहसिलदार रमेश देवकर यांच्याकडे संस्थेच्या कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Covid 19 )कडे जमा करण्यासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संचालक दादासो.प्रशांतराव विनायक पाटील ताईसो.डाँ.पूनम प्रशांतराव पाटील व ग.स.सोसायटी चे माजी अध्यक्ष विलास नेरकर सकाळ वृत्तसमूहाचे प्रतिनिधी सुधाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.