Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात पण हे फार दिवस चालणार नाही,” चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य

अनिल परब, संजय राऊत यांचीही चौकशी करा ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतद पाटील यांची मागणी

najarkaid live by najarkaid live
April 24, 2021
in राजकारण
0
राजीनामे पुरेसे नसून मोक्का लावा…
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – परमवीरसिंग यांच्या पत्रावरून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशी केली व त्यानुसार एफआयआर दाखल करून छापे मारले. त्याचप्रमाणे एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपांच्या संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पुण्यात केली.

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांची राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रावरून उच्च न्यायालयाने तत्कालीन गृहमंत्र्यांविरुद्ध गंभीर आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानुसार सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. त्याच प्रकारचे गंभीर आरोप सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याने परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर केले आहेत. अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या पन्नास कंत्राटदारांकडून शंभर कोटी रुपये गोळा करण्याची सूचना दिली होती, असा आरोप वाझे या महाविकास आघाडी सरकारने निलंबन रद्द करून पुन्हा पोलीस सेवेत आणलेल्या अधिकाऱ्याने केला. त्यावर परब यांनी खुलासा केला असला तरी सीबीआय चौकशी झाल्यानंतरच त्यातील सत्य बाहेर येईल. वाझे याच्या पत्रात घोडावत नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. घोडावत याचीही सीबीआय चौकशी करावी.

“काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत. हे फार दिवस चालणार नाही,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कारवाई चालू आहे, तरीही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कारवाईला भाजपाचे कारस्थान म्हटले आहे. मुश्रीफ यांचे हे विधान उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे.

ते म्हणाले की, परमवीरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्या न्यायालयाने प्रकरण गंभीर आहे असे सांगत आधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्याच्या विरोधात अनिल देशमुख व महाराष्ट्र सरकारने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. या सर्वांमध्ये भारतीय जनता पार्टीचा संबंध कोठे येतो ? त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी भाजपावर केलेला आरोप हास्यास्पद आहे

Spread the love
Tags: #bjp maharashtra#chandrakantdada patil
ADVERTISEMENT
Previous Post

खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले ; गृहीणीचे आर्थिक गणित बिघडले

Next Post

पाचोरा तालुक्यात कोविड सेंटर उभे करा : कॉग्रेसची मागणी

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
पाचोरा तालुक्यात कोविड सेंटर उभे करा : कॉग्रेसची मागणी

पाचोरा तालुक्यात कोविड सेंटर उभे करा : कॉग्रेसची मागणी

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us