Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काश्मिर व लडाख देशाचे मस्तक-नरेंद्र मोदी

najarkaid by najarkaid
October 14, 2019
in राज्य
0
काश्मिर व लडाख देशाचे मस्तक-नरेंद्र मोदी
ADVERTISEMENT

Spread the love

  • कसं कसं काय जळगांव…महाजनादेश देणार का असे मराठीत मोदींनी म्हणताच उपस्थितांमध्ये मोदी मोदीचा जयघोष

जळगाव – काश्मिर व लढाख हे भारताच्या जमिनीचा नुसताच तुकडा नसून भारताचे मस्तक आहे, म्हणूनच कलम 370 चा धाडसी निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि या निर्णयाचे संपूर्ण देशवासियांनी जल्‍लोषात स्वागत केले. परंतु विरोधक मात्र याचे राजकारण करीत आहे. जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावले असून हा बदल केवळ तुमच्या एका मताने झाला आहे. आता देखील येत्या 21 तारखेला महाजनादेश देऊन तुम्ही पुन्हा आपले सरकार आणून समर्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी हातभार लावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जळगाव येथील महाजनादेश संकल्प सभेत केले.
जळगावातील केळी पिकाला योग्य मोबदला देण्यासह रस्ते, रेल्वेचे जाळे विणले जाऊन जळगावात औद्योगिक क्षेत्रात भरभराट आणून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी जळगावात विमानतळाच्या समोरील जागेवर जाहीर सभा घेतली . त्या वेळी ते बोलत होते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून सुरुवातीला मराठीतून जनादेश देणार का ? असे आवाहन केले . नव्या भातासाठी आदेश दिला होता 130 कोटी जनतेच्या पुर्तेतेसाठी प्रयत्न करून भारताचा जोश जगाला दाखवून दिला . नव्या भारताचा जोश जगदेखील पाहणार असून आपण भारताच्या प्रतिमेला चार चांद लावले. जगात भारताला सलाम दिला गेला आहे . नवा भारत आला आहे . माझा भारत भविष्याकरिता तयार आहे , 370 कलमांवर बोलताना मोदी म्हणाले कि जम्मू काश्मीर हे भारताचे मस्तक आहे . 40 वर्षापर्यंत जी परिस्थिती राहिली नाही तिला चार महिने देखील लागणार नाही . विरोधकांनी हिम्मत असेल तर माझ्यासारखे निर्णय करून दाखवावे असे आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी केले .
या जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस , ना. गिरीश महाजन,आ. राजूमामा भोळे,, आ. स्मिता वाघ,खा. उन्मेष पाटील,ना. गुरुमुख जगवाणी , महापौर सीमा भोळे, ना. उज्ज्वला पाटील, आ. चंदुभाई पटेल, आ. संजय सावकारे, मंगेश चव्हाण, आ. गुलाबराव पाटील, आ.किशोर पाटील, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. दरम्यान, लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दात हातवारे करून टीका करणार्‍या शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधील सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ’आम्ही नटरंग नाही, त्यामुळे तसे हातवारे करीत नाही. ते आम्हाला शोभत नाही. पवारांची मानसिकता ढासळली असल्याने असे हातवारे करीत आहेत,’असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा आज जळगावात झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेदरम्यान मतदारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ”खरा पैलवान कोण? हे जनता 24 ऑक्टोबरला दाखवून देईल. तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही. तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळी आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
दरम्यान, निवडणुकीमध्ये बंडखोरांकडे लक्ष देऊ नका, त्यांना कुणाचाही आशीर्वाद लाभलेला नाही. त्यामुळे पक्षचिन्ह असलेले उमेदवार निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणीच विरोधक नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला. सोलापूरमधील बार्शीत पवारांनी शनिवारी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली. शरद पवारांचे निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बार्शीत राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. ’मुख्यमंत्री म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीसाठी कोणी समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते. अशांची (हातवारे करून) होत नाही,’ अशी टीका पवारांनी केली. पवारांनी केलेल्या हातवार्‍यांवर भाजपा नेत्यांनी आक्षेप घेतला होता.
संकट मोचक म्हणून ना. गिरीष महाजनांचा मुख्यमंत्र्याकडून उल्‍लेख

जळगाव – उत्तर महाराष्ट्रात सिंचनाची कामे त्वरीत मार्गी लावून शेतकर्‍यांना मुबलक पाणी उपलब्ध केले जाईल. यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेळगाव बॅरेज, वरखेड लोंढे आदी सिंचनाची कामे अंतिम टप्यात असून उत्तर महाराष्ट्रातील सिंचनाचा बॅकलॉक भरून काढला जाईल असे ठोस आश्‍वासन ना. फडणवीस यांनी देत ना. गिरीष महाजन यांचा संकट मोचक म्हणून उल्‍लेख केला.
ना. गिरीष महाजन यांनी पक्षात ज्या ज्या वेळी धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा ना. गिरीष महाजन यांनी राज्याचे संकट मोचक म्हणून धाव घेऊन अनेक प्रश्‍न समन्वयातून मार्गी लावले आहे. यामुळेच उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व ना. गिरीष महाजन यांच्याकडे सोपविली गेली आहे असे ना. फडणवीस यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.

विकासासाठी पुन्हा आर्शिवाद द्या-आ.राजूमामा भोळे 

जळगाव – जळगाव महानगरपालिका निवडणुकीत जळगावकरांनी भाजपाला महाजनादेशन देऊन भरभरून आर्शिवाद दिला असून दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केलेली असून अनेक विकास कामे प्रगती पथावर आहेत. त्याच बरोबर मनपावर असलेले हुडकोचे कर्ज पाठपुरावा करत माफ केले. यामुळे कोटयवधींच्या कर्जातून मनपाला मुक्‍त केले आहे. यापुढेही विकास कामे करण्यासाठी मी वचन बध्द असल्याचे सांगत जळगाव शहराच्या सर्वांगिण विकासासाठी येत्या 21 ऑक्टोबरला पुन्हा कमळ चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मतांनी मला विजयी करा असे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव ग्रामीण मधून रवी देशमुख यांना वंचित आघाडीचा पाठिंबा 

Next Post

युवानेते सुमित किशोर पाटील यांचा महायुतीच्या प्रचारार्थ मतदार संघात झंझावात 

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
युवानेते सुमित किशोर पाटील यांचा महायुतीच्या प्रचारार्थ मतदार संघात झंझावात 

युवानेते सुमित किशोर पाटील यांचा महायुतीच्या प्रचारार्थ मतदार संघात झंझावात 

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us