जळगाव – येथील कादंबरी चौधरीने रेखाटलेल्या चित्रांचे ‘चित्रबोध’ हे प्रदर्शन अमरावती शहरातील प्रसिध्द कलादालन पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स येथे दि.9 ते 13 जानेवारी दरम्यान आयोजीत केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खा.नवनीत रवीराणा, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पो.अ.संजीव बाविस्कर यांचेहस्ते होणार आहे.
कादंबरी चौधरी ही आय.एम.आर.महाविद्यालयात एमसीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून तीने कोणतेही प्रोफेशनल शिक्षण घेतलेले नसताना तीने रेखाटलेल्या चित्रांचे सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे.














