Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कांताई बंधारा ठरतोय मुख्यजलस्त्रोत !

najarkaid by najarkaid
September 19, 2019
in जळगाव
0
कांताई बंधारा ठरतोय मुख्यजलस्त्रोत !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी (दि.19)– गिरणा धरण व बहुळा-दहिगाव प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी कांताई बंधारा ओसंडून वाहतो आहे, यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

पाणी म्हणजे ‘जीवन’. जीवनमान उंचाविण्याचे माध्यम. पाण्याचे शाश्वत स्त्रोत ग्रामीणस्तरावर निर्माण व्हावे, यासाठी श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीने कांताई बंधाऱ्याची निर्मिती झाली. सुमारे पाच किलोमीटर परिघातील गावांमधील हजारो लोकांचा जीवनस्तर उंचावण्याचे प्रभावी माध्यम कांताई बंधारा ठरत आहे. विहिरी, बोअरवेल यांना पाझर फुटून भूजलस्तर वाढला आहे. शेत-शिवार फुलले आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन गावांमधील स्थलांतर थांबण्याबरोबरच या परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी कांताई बंधारा मुख्य जलस्त्रोत ठरत आहे.
पाणी टंचाईचे संभाव्य धोके टाळण्यासाठी नद्यांवर जागोजागी बंधारे बांधून पाणी अडविण्याशिवाय पर्याय नाही हे मोठ्याभाऊंनी जाणले. जळगावला लागूनच गिरणा नदी वाहते, मात्र नियोजनच्या अभावामुळे या परिसरात आधी पाण्याचे दुर्भिक्ष होते. पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण व्हावेत; यासाठी जळगाव तालुक्यातील धानोरा आणि कढोली परिसरात बंधारा बांधण्याचे डॉ. भवरलालजी जैन यांनी निश्चित केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. च्या आर्थिक सहयोगाने तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत यासंदर्भात शासनाशी करार करण्यात आला. झालेल्या करारानुसार  परिसरातील अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे.
जीवनदायी गिरणा नदी 
कांताई बंधारा हा गिरणा धरणापासून १४० किलोमीटर अंतरावर आहे. यादरम्यान सहा बंधारे आहेत. गिरणेला हिरवा, बहुळा, चितुर या मुख्य उपनद्यांसह लहान-मोठे नाल्यांमधून पाण्याची आवाक होत असते. समाधानकारक पावसामुळे सध्या गिरणा धरणातून २ हजार ५०० क्यूसेस तर बहुळा-दहिगाव प्रकल्पातून ११ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे कांताई बंधारा ओसंडून वाहत आहे. गिरणा नदीला आलेल्या पाण्यामुळे परिसरातील हजारो शेतकरी सुखावले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळांमुळे बळिराजा खचला होता. जीवनदायी असलेली नदी वाहत असल्याने त्याला नवी उमेद आली आहे.
हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली
कांताई बंधारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून अवघ्या ९ महिने ११ दिवसात पूर्ण झाला आहे. १८० कोटी लिटर क्षमता असून पाच किलोमीटर बॅकवॉटर आहे.  दापोरा, दापोरी, खेडी, धानोरा, कढोली, वैजनाथ, नागझिरी, मोहाडी, टाकरखेडा, सावखेडा, बांभोरी, निमखेडी, आव्हाणा या गावांना बंधाऱ्याचा प्रत्यक्ष फायदा होत आहे. यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. शेकडो विहिरी बोअरवेलांचे भूजलस्तर उंचावले आहेत. यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.
दळणवळणासह आर्थिकस्तर उंचावला
पाण्याच्या उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरी नगदी पिके घेऊ लागले आहेत. वर्षाला तीनदा पीक घेता येत आहे. केळी, कांदा, भाजीपाला, कापूस या बागायत पिकांकडे शेतकरी वळले आहेत. यामुळे आर्थिक चलन-वलन होऊन त्यांचा आर्थिकस्तर उंचावला आहे. तसेच कांताई बंधाऱ्याजवळ जोडरस्ता तयार करून दिला आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांना दळणवळणाची सुविधा निर्माण झाल्याने मुख्य बाजारपेठांपर्यंत त्यांना लवकर पोहचता येत आहे, याचा फायदा विद्यार्थ्यांसह, प्रवाशांनाही होत आहे.
बंधाऱ्याची ठळक वैशिष्ट्ये
जळगाव तालुक्यातील धानोरा आणि कढोली परिसरातील गिरणा नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची पाणी क्षमता १७९.१८ कोटी असून याचे पाणलोट क्षेत्र ९१३.६१ चौरस किमी. एवढे आहे. या बंधाऱ्याची लांबी गिरणेच्या पात्राप्रमाणे २४६ मीटर एवढी असून त्याची जास्तीत जास्त उंची ८.९२ मीटर एवढी आहे. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला असताना याचे बॅकवॉटर सुमारे ५.६६० मीटर पर्यंत जाते. बंधाऱ्याच्या भिंतींची उंची साडेचार मीटर असून ८१ दरवाजे ठेवण्यात आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यशस्वी उद्योजकता विषयावर अनील कांकरिया यांचा कानमंत्र !

Next Post

मुकुंद सपकाळे यांचा रिपाइं  पक्षात प्रवेश 

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
मुकुंद सपकाळे यांचा रिपाइं  पक्षात प्रवेश 

मुकुंद सपकाळे यांचा रिपाइं  पक्षात प्रवेश 

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us