काँग्रेस,राष्ट्रवादी,भाजपच्या ‘आरक्षणाच्या फ्रॉडला’ शिवसेनेनं दुरुस्त करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज आपल्या ट्विटर हॅण्डल वरून केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “शासनाने २००६ ला खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये ५०% आरक्षणाची तरतूद करण्यात आली.मात्र एक पत्रक काढून त्याला २५%करण्यात आलं.OBC वर्ग मोठ्याप्रमाणात शिवसेनेचा मतदार आहे.काँग्रेस,राष्ट्रवादी,भाजपच्या ‘या फ्रॉडला’ शिवसेनेनं दुरुस्त करावं,अन्यथा १५ दिवसांत याला न्यायालयात आव्हान देऊ” यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.














