Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही- त्रिसदस्यीय समितीचा अहवाल

najarkaid by najarkaid
March 4, 2022
in राज्य
0
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही- त्रिसदस्यीय समितीचा अहवाल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,  दि. ४ मार्च २०२२ –  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, अशी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी आज दिली. त्यामुळे संपकाळात ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई किंवा बडतर्फीची नोटीस बजावली आहे ती मागे घेण्यात येईल, असे सांगतानाच कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी १० मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी श्री.परब यांनी केले.

तसेच जे कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, त्यांनी अपील करावे आणि ज्यांचा अपिल करण्याचा कालावधी संपलेला असेल अशा कामगांराना १५ दिवसांची मुदतवाढ वाढवून देण्यात येईल, असेही ॲड.परब यांनी स्पष्ट केले.

राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या ४ महिन्यांहून अधिककाळ बेमुदत संपावर आहेत. संपाच्या मुद्यावर माननीय मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. माननीय न्यायालयाने एसटीच्या विलिनीकरणाच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारला त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश दिले होते.

राज्य सरकारने नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल न्यायालयात सादर केला होता. सदर अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला.  मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल सादर केला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी अॅड. परब बोलत होते.

या अहवालामध्ये एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे ही एसटी कामगारांची मागणी त्रिसदस्यीय समितीने अमान्य केलेली आहे. त्यासाठी समितीने प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशिरबाबींवर सखोल अभ्यास करुन त्यांनी आपल मत हे माननीय उच्च न्यायालयाला कळविलेले आहे. या सर्व तिन्ही बाबींवर महामंडळात एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण होणार नाही हे स्पष्टपणे नमूद केले असल्याचे श्री. परब यांनी सांगितले.

विलिनीकरणामुळे पगाराचा प्रश्न सुटेल, पगार वेळेत होईल, असे प्रश्न कामगारांच्या मनात होते. परंतु, राज्य सरकारने हा संप चालू असतानाच ज्यांची एसटीत १ ते १० वर्षांपर्यंत सेवा झाली आहे त्यांच्या मुळ पगारात ५ हजार रूपये तर ज्यांची १० ते २० वर्षे सेवा झाली आहे त्यांच्या मुळ पगारात ४ हजार रूपये तसेच जे कामगार २० वर्षाहून अधिककाळ सेवेत आहेत, अशा कामगारांच्या मुळ पगारात २५०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.  तसेच  ही वाढ करून कामगारांचे पगार १० तारखेच्या आत होतील याची हमी राज्य सरकारने घेतली आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर जाण्याऐवजी आपण कामावर या… अशी विनंती केली होती. एसटी बंद करून किंवा एसटीचं नुकसान करून आपल्या मागण्या पदरात पाडून हे कोणालाही परवडणारे नाही. कारण एसटी ही सर्व सामान्यांची, ग्रामीण जनतेची गरज आहे. ग्रामीण भागांतून तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज, शाळेमधील मुलं, ज्येष्ठ नागरिक एसटीचा वापर करीत असतात. एसटी ही गरिब माणसाची जीवनवाहिनी आहे, ती तुम्ही बंद करू नका असे वारंवार आवाहन सरकारने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी २८ हजारांहून अधिक कामगार कर्तव्यावर रूजू झाले असून अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर आलेले नाहीत, असे सांगतानाच जे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, परंतु ज्यांच्यावर कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर यावे.

तसेच ज्या कामगारांवर निलंबनाची कारवाई आणि बडतर्फीची नोटीस दिली गेली आहे, त्या कामगारांवरील निलंबनाची कारवाई आणि बडतर्फीची नोटीस मागे घेतली जाईल. तसेच ज्यांना बडतर्फ केले आहे त्यांनी देखील अपील करावे. त्यांचे अपिल कायदेशिर प्रक्रियेअंती निकाली काढण्यात येईल, असेही श्री.परब यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला मान्य करायला लावू ; माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

Next Post

वस्तू आणि सेवा करातील घोटाळाप्रकरणी निर्यातदाराला अटक

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
पोलिसात मुलगी मिसिंग तक्रार दाखल करणाऱ्या बापकडून मुलगी शोधून देण्याच्या नावानं दोन महिला पत्रकारांनी पैसे उकळले ; गुन्हा दाखल

वस्तू आणि सेवा करातील घोटाळाप्रकरणी निर्यातदाराला अटक

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us