- एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये मध्यरात्री चोरी
- चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : चेअरमन दालनातील तिजोरी नेली चोरून




जळगाव – शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली रोडवरील एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये दि.30 रोजीच्या मध्यरात्री चार चोरटयांनी चोरी झाल्याची घटना घडली असून चेअरमन दालनातील तिजोरी चोरटयांनी चोरून नेल्याचे सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.तिजोरीत तीस हजार रुपयाची रोख रक्कम होती असे शाळेच्या संचालकांनी पोलिसांना सांगितले आहे.
याबाबत सविस्तर असे की, एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये मध्यरात्री 1वाजून 2 मिनिटांनी चोरटयांनी मागील गेटचे काच फोडून स्कूल मध्ये चार जणांनी प्रवेश करत प्राचार्य,चेअरमन व शेजारील दोन कॅबिनचे लॉक तोडून शोधाशोध केली वर काहीच न मिळाल्याने चेअरमन दालनातील तिजोरी चोरटयांनी थेट चोरून 1वाजून 18 मिनिटांनी स्कूल मधून निघून गेल्याचे सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसत आहे.याबाबत स्कूल प्रशासनाने एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असून गुन्हा नोंदविण्या काम सुरु आहे.