Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उद्यापासून कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार

najarkaid by najarkaid
June 9, 2020
in आरोग्य, जळगाव
0
डाॅ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज ‘कोविड १९ हॉस्पिटल’ म्हणून घोषित !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 9 (प्रतिनिधी) : कोरोना (COVID 19) विषाणूबाधित व  संशयित रुग्णांवरील उपचाराकरीता जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 400 बेडस अधिग्रहित करण्यात आले आहेत. यात 28 आयसीयू व 150 ऑक्सिजन सुविधा असलेल्या बेडसचा समावेश आहे. या रुग्णालयात 11 जून 2020 पासून संबंधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे सध्या उपचार घेत असलेल्या भविष्यात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचाराकरीता गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल अँड जनरल हॉस्पिटल, जळगाव हे वैद्यकीय उपचारांसाठी अत्यावश्यक बाब म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अधिग्रहित करण्यात आले असून ते डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या महाविद्यालयातील 400 बेडस डेडिकेटेड हॉस्पिटल करिता अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. तसेच 8 जून 2020 रोजी जळगाव जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालय व्यवस्थापनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत या योजनेत समाविष्ट असणाऱ्या सर्व आजारांवर उपचार घेण्याची मुभा सर्व नागरिकांना शासनातर्फे उपलब्ध करून दिल्याबाबत संबंधित रुग्णालयांना अवगत केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व नोडल अधिकाऱ्यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट देवून पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना (कोविड 19 बाधित, संशयित रुग्ण वगळून) डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध असलेल्या उपचाराच्या अत्यावश्यक सेवा 7 जून 2020 रोजीच्या आदेशाच्या पूर्वस्थितीप्रमाणे सुरू ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रथमत: तेथील 400 बेडस हे कोविड बाधि, संशयित रुग्णांकरीता उपलब्ध करुन देणे आवश्कय आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे.
या रुग्णालयात वरील नमूद केलेले 40 0बेडस गवळता उपलब्ध असलेले अन्य बेडस, अन्य अत्यावश्यक सेवा, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध होत असलेल्या सर्व सुविधा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच अन्य रुग्णांसाठी (कोविड 19 विषाणूमुळे बाधित, संशयित रुग्ण वगळून) उपलब्ध असतील. तसेच कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक पीपीई कीट, एन- 95 मास्क आदी शासनाच्या धोरणाप्रमाणे रुग्णालय व्यवस्थापनाने खरेदी करावेत. त्याचा तपशील जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रमाणित केल्यावर जिल्हा प्रशासनाकडून या खर्चाची भरपाई करण्यात येईल. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाने सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड बाधित रुग्णांवर करावयाचे उपचार याविषयी प्रशिक्षण द्यावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलिसांची भूमिका संशयास्पद ; अरविंद बनसोड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा – प्रकाश आंबेडकर

Next Post

जिल्ह्यात आज ११६ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात आज ११६ कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us