किनगाव ता.यावल, ( प्रतिनिधी) – उमेद महिला संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत किनगाव खुर्द येथील परराज्यातून गुजरात व नवसारी येथून आलेल्या 21 लोकांना जिल्हा परिषद मराठी शाळेत चार खोल्यांमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे तर आपणही समाजाचे देणे लागतो या अनुषंगाने 21 लोकांना उमेद महिला संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती याअंतर्गत महिलांनी त्यांना जेवणाचे वितरण केले यावेळी उमेद च्या सीआरपी नलू भगवान सावकारे ,वर्धिनी लता संतोष सावकारे, वर्धिनी प्रमिला महेश जोगी बँक सखी वैशाली संजय पाटील एफ एल सखी ज्योती रतिलाल तायडे ,पशु सखी सीमा शरद पाटील ,कृषी सखी संजीवनी संभाजी तायडे, खुर्द उपसरपंच शरद अडकमोल ,ग्रामपंचायत सदस्य बबलूकोळी ,लिपिक सुरेश सोनवणे ,राहुल सोनवणे, रोजगार सेवक मुकेश साळवे, यांची उपस्थिती होती तर ग्रामपंचायत तर्फे त्यांना मास्क सॕनेटायजर देण्यात आले आहे व ग्रामपंचायत कडून त्यांची काळजी घेण्यात येत आहे.