Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंना आमदार सोडून गेले तर उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत ?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

najarkaid live by najarkaid live
November 13, 2022
in Uncategorized
0
चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे  शिंदे फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही  – चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणेघेणे नव्हते. ते बोलत नाहीत म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले तर त्यांच्या काळात उद्योजक महाराष्ट्राबाहेर का जाणार नाहीत ? आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सांगली येथे केली.

ते सांगली जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कामगारमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. गोपीचंद पडळकर आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे उपस्थित होते.

मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात गुंतवणूक व्हायची असेल तर उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री अठरा महिने मंत्रालयात फिरकले नाहीत. वरिष्ठ सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पहावी लागे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार यांना आणि काँग्रेस पक्षाला सांभाळण्यात जात होता. त्यांनी स्वतःला बंदिस्त केले होते. ते कोणाला बोलण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्यांच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका होत नव्हत्या, उद्योगांना जागा दिली जात नव्हती, करार होत नव्हते, पर्यावरण परवानग्या दिल्या जात नव्हत्या, उद्योजकांचे शंकानिरसन केले जात नव्हते. यामुळे महाविकास आघाडी सरकारमुळे एकेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे.

त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात आली असताना त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होण्याच्या ऐवजी काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. कोल्हापूरमध्ये काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी सातारा, ठाणे, मीरा भाईंदर अशा ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांची यात्रा राज्यात असताना काँग्रेस कार्यकर्ते भाजपात का प्रवेश करत आहेत, हा त्या पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे.

त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळ आहे आणि नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. भाजपामध्ये आम्ही सत्तेसाठी नाही तर राष्ट्रासाठी आणि विचारासाठी काम करतो. हीच पक्षातील सर्वांची भूमिका आहे. गटातटाचे राजकारण करणाऱ्यांना भाजपामध्ये स्थान नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप ; खान्देशातील हजारो शेतकऱ्यांच्या भेटीमुळे विक्रमी प्रतिसाद

Next Post

शेतकरी योजना ; शेततळे करिता अनुदान मिळवा, जाणून घ्या….

Related Posts

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

शेतकरी योजना ; शेततळे करिता अनुदान मिळवा, जाणून घ्या....

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us