जळगाव.दि.27 – संपूर्ण जगात हा-हा कार माजविणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी त्याला हद्दपार करण्यासाठी समाजातील सर्वच घटक आप-आपल्या परिने झटत आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि रेडक्रॉस सोसायटी,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे श्रमदान आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या आर्थिक योगदानातून कोरोना संक्रमणाच्या काळात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी समाजातील विविध दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी आपण समाजाचे काही लागतो संकट समयी समाजाप्रति बांधिलकीचे दर्शन घडवत आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषध गोळ्यांची निर्मिती करून त्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध करून देण्यासाठी यापुर्वी तयार केलेल्या 3लाख 50 हजार बाटल्यांचे वितरण ग्रामिण भागात केले आणि अजून 11 लाख 50 हजार बाटल्या तयार करून त्या प्रत्येक व्यक्ती पर्यत मोफत पोहचतील अशी व्यवस्था या दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी केलेली आहे.
जळगाव येथील एम.जे.कॉलेज मध्ये जिल्हा प्रशासन आणि रेडक्रॉस सोसायटी,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून तयार करण्यात येत असलेल्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देवून प्रत्येक्ष पाहणी केली असता त्यांनी समाधान व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना आणि या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी सर्व यंत्रणेंबाबत गोरवोदगार काढले आणि हे खऱ्या अर्थाने समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी नाशिक विभागाचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त आणि माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री.रविंद्र जाधव, आर्सेनिक अल्बम -30 या होमिपॅथी औषधी जात पडताळणी समिती अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर,रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेनन,सचिव विनोद बियाणी,सुभाष साकला,प्रा.आर.जी.पाटील,वाय.पी.पाटील,डॉ.योगेश बोरसे,डॉ.योगेश महाले,प्रा.दिलवरसिंग वसावे,डॉ.राजेश भामरे,डॉ.राजू गवारे,प्राचार्या डॉ.गौरी राणे,डॉ.जयेंद्र लेकुरवाडे,प्रा.दिपक पवार,डॉ.सुजाता गायकवाड,डॉ.अनिता कोल्हे,प्रा.संतोष सोनवणे,प्रा.रविकुमार परदेशी आदि मान्यवर स्वयंसेवक व प्राध्यपक वृंद उपस्थित होते.
निवृत्त विभागीय आयुक्त रविंद्र जाधव यांनी आर्सेनिक अल्बम -30 या होमिओपॅथी औषधीच्या निमिर्ती आणि मोफत वाटप या संकलपनेबद्दल संबंधितांना समाजाच्या वतीने धन्यवाद देत हे पुण्याचे काम आपल्या वाट्याला आले आपण भाग्यवान आहात असे औषधी गोळया तयार करणाऱ्या आणि मोफत वाटणाऱ्या दात्या दानशूर व्यक्ती आणि संस्थांबाबत गौरओदगार काढले आणि शुभेच्छा दिल्यात.
प्रारंभी जात पडताळणी समिती अध्याक्ष आणि नोडल अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मान्यवरांना या औषध गोळ्यांची निर्मिती आणि वाटप व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती सांगितली.