Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने आता रिव्हर्स होऊ शकतो टाईप २ डायबेटीस!

माधवबागच्या रिसर्चला JAPI ( जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया) या जगप्रसिद्ध रिसर्च पेपर द्वारे मान्यता प्राप्त

najarkaid live by najarkaid live
November 10, 2021
in Uncategorized
0
आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने आता रिव्हर्स होऊ शकतो टाईप २ डायबेटीस!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव(प्रतिनिधी)- जागतिक आरोग्य संघटने नुसार भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाणारा देश आहे असे समजले जाते. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात मधुमेह पसरत चालला आहे. आज पाहिलं तर प्रत्येक घरात एकतरी मधुमेही रुग्ण हा असतोच. शिवाय एकदा का मधुमेह झाला की तो कधीच बरा होत नाही. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधं किंवा इन्सुलिन घ्यावे लागतात असा समज समाजात पसरलेला आहे. तसंच डायबेटीसमुळे हृदयरोग, हार्ट अटॅक, किडणी फेल्युअर, नजर कमजोर होणे अशा कॉम्प्लिकेशन्सना चाळीशी पुढीलच नाही तर तीस वर्षाखालील तरुण पिढी ही या गंभीर समस्यांचा सामना करत असल्याचं दिसून येत आहे.

याचं महत्वाचं कारण म्हणजेच बदललेली व चुकीची जीवनशैली आणि आजाराविषयीची असलेली अपुरी माहिती. याच अनुषंगाने डायबेटीस रिव्हर्सल विषयीचं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधवबागचे मुंबई येथील रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट हेड डॉ. राहुल मांडोळे, जळगांव क्लिनिक फ्रँचायझी ओनर डॉ. श्रेयस महाजन आणि क्लिनिक हेड डॉ. श्रद्धा महाजन माळी हे उपस्थित होते.

डायबेटीसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत अनेक संशोधनं करण्यात आली तसंच अनेक ॲडव्हान्स ट्रिटमेंट ही आल्या पण तरीही मधुमेही रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसून येत नाही. त्यात आयुर्वेदिक पंचकर्म व डाएटच्या मदतीने डायबेटीस रिव्हर्स होऊ शकतो असं जर सांगितलं तर आयुर्वेदा विषयी लोकांच्या मनात मोठं प्रश्नचिन्हच उभ राहतं. कारण आयुर्वेदिक ट्रिटमेंट सगळ्यांनाच सूट होते असं नाही किंवा आयुर्वेदिक ट्रिटमेंटमध्ये आजार बरा व्हायला खूप उशीर लागतो शिवाय आयुर्वेदिक पंचकर्म चालू आहे तोपर्यंत कदाचित डायबेटीस कंट्रोलमध्ये दिसेलही पण एकदा का ट्रिटमेंट थांबवली तरी डायबेटीस कंट्रोलमधेच राहील का? पुन्हा डायबेटीस होणार नाही का? अशा पद्धतीची आयुर्वेदावर नेहमी शंका दाखवली जाते. याच अनुषंगाने आयुर्वेदाविषयी असलेली शंका आणि डायबेटीस रुग्णांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं म्हणून आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबागचे संस्थापक व संचालक डॉ. रोहित माधव साने, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुदत्त अमीन, पेशंट एंगेजमेंट हेड डॉ. सुहास डावखर आणि रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट हेड डॉ.राहुल मंडोले यांनी सन २०१८ मध्ये एकूण ८२ टाईप २ डायबेटीस रुग्णांच्या जीवनशैलीवर संशोधन सुरु केलं.

आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप २ डायबेटीस मॅनेजमेंट हे त्या संशोधनाचं नाव. टाईप २ डायबेटीज रुग्णांच्या जीवनशैली विषयीचा अभ्यास किंवा ते संशोधन असं होतं की, तीन महिने डाएट बॉक्स व डायबेटीस रिव्हर्सल पंचकर्म ट्रिटमेंट घेऊन जे रुग्ण जिटीटी (ग्लोकोज टॉलरन्स टेस्ट) पास झाले होते. म्हणजेच ७५ ग्रॅम साखर खाऊनसुद्धा ज्यांची शुगर नॉर्मल आली होती म्हणजेच या रुग्णांमध्ये रक्तातील साखर पचवण्याची क्षमता सामान्य म्हणजेच नॉन डायबेटीक लोकांप्रमाणे झाली होती अशा रुग्णांना वर्षभर डायबेटीसची कोणतीही ॲलोपॅथी औषधं न देता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

त्यानंतर पुन्हा एकावर्षाने त्यांची जिटीटी (ग्लोकोज टॉलरन्स टेस्ट ) टेस्ट करून तीन महिन्यांची ॲव्हरेज दाखवणारी गोल्ड स्टॅण्डर्ड HbA1c चाचणी करण्यात आली. या चाचणीत एक वर्षा नंतर एकूण ८२ रुग्णांपैकी ७६ रुग्णांची HbA1c चाचणी नॉर्मल आली. एकंदरीत या निरीक्षणाचा निष्कर्ष पाहता ९२% रुग्ण हे वर्षभर कोणत्याही औषधांवर नसूनसुद्धा त्यांची शुगर ही नॉर्मल आली म्हणजे ते रुग्ण नॉन डायबेटीक झालेले आहेत कारण त्यांच्यात १५ जिलेबी खाऊन जितकी साखर रक्तात निर्माण होते म्हणजेच ७५ ग्रॅम शुगर खाऊन सुद्धा सामान्य, नॉन डायबेटीक लोकांप्रमाणे शुगर पाचवण्याची क्षमता निर्माण झाली आहे असे सिद्ध झाले.

याचाच अर्थ एकदा डायबेटीस रिव्हर्स झाला की तो पुन्हा होत नाही हे या संशोधनाद्वारे समोर आले. आणि याच संशोधनाला JAPI ( जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया) या जगप्रसिद्ध रिसर्च पेपरची मान्यता प्राप्त झाली व सप्टेंबर २०२१ मध्ये माधवबागचा आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप २ डायबेटीस मॅनेजमेंट हा रिसर्च पेपर JAPI च्या संशोधन प्रबंधामध्ये पब्लिश होऊन आला.

याचाच अर्थ भारताला सापासारखा विळखा घालून बसलेल्या या टाईप २ डायबेटीसला रिव्हर्स करण्याची त्याला परतवून लावण्याची ताकत आयुर्वेदामध्ये आहे हे या संशोधनातून सिद्ध झालं.

Spread the love
Tags: #माधव बाग #madhav bag #मधुमेह #डायबेटीस
ADVERTISEMENT
Previous Post

उमरे येथील जवानाने फौजी प्रशिक्षण पुर्ण झाल्याने आज निघणार मिरवणूक

Next Post

विधान परिषदेच्या ‘या’ ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

Related Posts

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

विधान परिषदेच्या 'या' ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us