Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा ६ रोजी समारोप ; तीन दिवसात हजारो शेतकर्‍यांनी दिल्या भेटी

प्रक्रीया उद्योगासाठी मिनी दाल मिल, फवारणीसाठीचे ड्रोन, इलेक्ट्रिक बुल ठरतोय प्रदर्शनाचे आकर्षण

najarkaid live by najarkaid live
November 5, 2023
in जळगाव
0
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा ६ रोजी समारोप ; तीन दिवसात हजारो शेतकर्‍यांनी दिल्या भेटी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर सुरू असलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास पहिल्या तीनच दिवसात हजारो शेतकर्‍यांनी भेटी दिल्या. यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यासह धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, बर्‍हाणपूर आदी जिल्ह्यातून शेतकरी आले होते. दरम्यान, प्रदर्शनाचा उद्या (सोमवार, दि.6) समारोप होणार असल्याने शेतकर्‍यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाने उपयुक्त ठरणार्‍या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्डच्यावतीने दि. 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान एकलव्य क्रीडा संकुल येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून प्रदर्शनात प्रक्रीया उद्योगासाठी मिनी दाल मिल, फवारणीसाठीचे ड्रोन, मजूर समस्येला पर्यायी इलेक्ट्रिक बुल, मिल्कींग मशीन, प्राण्यांपासून पिकांचे सरंक्षण करणारे झटका मशीन यासांरखे वैशिष्ठ्यपूर्ण व अत्याधुनिक कृषी उपकरणांचे स्टॉल उपलब्ध आहेत. जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, श्रीराम ठिबक, निर्मल सिड्स, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, आनंद अ‍ॅग्रो केअर, मेट्रोजेन बायोटेक, कमलसुधा ट्रॅक्टर, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.

शेतकर्‍यांना दिशा देण्याचे काम अ‍ॅग्रोवर्ल्ड करतेय : अनिल भोकरे

शेतकर्‍यांनी नेहमी आशावादी राहीले पाहीजे. जगात सर्व मिळू शकते, परंतु आशा कुठेच मिळत नाही. कोणाकडून काय ज्ञान घेता येईल, यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. सध्याच्या काळात शेतकर्‍यांना सर्वाधिक गरज आहे ती, ध्यान, समयसूचकता आणि दिशादर्शकाची. आणि हे दिशा देण्याचे काम अ‍ॅग्रोवर्ल्ड करीत आहे, असे प्रतिपादन जळगाव कृषी विभागाचे सेवानिवृत्त कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी अ‍ॅग्रोवर्ल्ड पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले. राईज न् शाईनचे अमेय पाटील, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, मेट्रोजेनचे संचालक प्रियंक शहा, ऋचा शहा, प्लॅन्टो कृषी तंत्रचे निखील चौधरी, अ‍ॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उल्लेखनीय कार्य करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान
प्रदर्शनात रविवारी (दि.5) देखील शेतकरी, शेतकरी गट, जोडव्यावसायिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्काराने मनोज वायकोळे, भारती पाटील, सुनिता पाटील, राजश्री वानखेडे, सुरेश पाटील, सागर पाटील, नारायण सोनवणे, मयुरी पाटील, शंकर पाटील, अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श गट शेती पुरस्काराने झाशीची राणी स्वयंसहायता महिला बचत गट, भूजल अभियान, रेणुका माता महिला शेतकरी गट, बळीराजा महिला शेतकरी गट, गुरुमाऊली महिला शेतकरी गट, राजे शेतकरी गट, श्री संत गजानन महाराज कापूस उत्पादक गट, अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श जोड व्यवसाय पुरस्काराने गोपाल सपकाळे, समर्पित वाघ, राजेंद्र पाटील, समाधान पाटील यांचा तर अ‍ॅग्रोवर्ल्ड जलदूत पुरस्काराने सुनिल पाटील आणि तृषाल तायवाडे आदींचा सत्कार करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विराट कोहलीने बर्थ डेच्या दिवशी ठोकले 49 वे वनडे शतक

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका ; डॉक्टर काय म्हणाले वाचा !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका ; डॉक्टर काय म्हणाले वाचा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका ; डॉक्टर काय म्हणाले वाचा !

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us