पाचोरा (प्रतिनीधी)—राज्यात रामराज्य येणार असे सांगणार्या मख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्या राज्यात सनेमके रामराज्य सुरू आहे की अधिकारी राज्य सुरू आहे.हा प्रश्न पाचोरेकरांना पडला आहे.यामागचे कारणही तसेच असुन शहरातिल भडगाव रोडवरिल एका वैद्यकिय क्षेञातिल डाॅक्टरला शुल्लक कारणावरून येथिल तहसिलदार यांनी चक्क श्रीमुखात वाजवल्याने एकच खळबळ उडाली.घटनेची चर्चा वाढल्याने व प्रकरण पाचोरा पोलिसांपर्यंत पोहचल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शेवटी तहसिलदार यांनी समंधित डाॅक्टरची माफी मागुन हा विषय थांबविला.माञ तालुक्याची जबाबदारी असलेल्या अधिकार्यांने सय्यम सोडुन केलेल्या कृत्याची सर्व स्थरातुन निंदा होत आहे.
पाचोरा शहर व तालुक्यात सध्याा जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने नदिपाञात रेतीसाठी वहाने उतरणार नाहीत असा आदेश असला तरी चोरटी रेती वाहतुक ही सुरूच आहे.यामुळे मागिल काळात प्रांताधिकार्यांच्या घरावरिल दगडफेक ते त्यांच्या वाहन चालकांला झालेली दुखापत अशा अनगाणत घटना घडुन गेल्या आहेत. भडगाव रोडवरिल डाॅ. पाटिल यांच्या दवाखान्याच्या फोअरिंगचे काम सुरू आहे.त्यांनी त्या कामासाठी घराजवळिल बांधकामातुन एक पॅजो भरून रेती आणली. ती दवाखान्याजवळ ओतण्याचे काम सूरू असतांना तालुक्याचे पालक तहसिलदार यांचे त्या भागातुन वाहान जात असतांना ते त्यांच्या लक्षात आले.त्यांनी लगेच गाडी थांबवत त्यांनी समंधित डाॅक्टरला रेती कुठुन आणली?त्याची परवानगी काढली होती का? असे व घटनेशी समंधित कोणतेही प्रश्न न विचारता सरळ त्यांच्या श्रीमुखात लगावली.यावेळी घटनास्थळी पोलिस कर्मचारीही होते.डाॅक्टर त्यांची बाजु मांडत असतांना त्यांनी ऐकुन घेण्याचीही तसदी घेतली नाही डाॅ. पाटील यांना त्यांच्या पेशंटचा फोन आला.तो त्यांनी उचलेला होता. तहसिलदार यांनी तो फोन हिसकवण्याचा प्रयत्न केला.डाॅ. पाटिल यांनी तहसिलदार महाशय यांधना समजवित घटनेची सविस्तर माहीती दिली तेंव्हा त्यांचा आवेश कमी झाला.
घडलेल्या घटनेने डाॅ. पाटिल हे अचंबित झाले व कारण नसतांना तहसालदारांनी श्रीमुखात लगावल्याचे दुःख त्यांना झाले.त्यांनी तत्काळ पाचोरा पोलिस स्टेशन गाठुन झालेला प्रकार पोलिस निरिक्षक अणिल शिंदे यांच्या समोर मांडला.पोलिस निरिक्षक यांनी परिस्थीती समजुन घेउन तहसिलदार महोदय यांना पाचोरा पोलिसात बोलविले.त्यांनी प्रथम असे घडलेच नाही असा आव आणला माञ यावेळी डाॅ. पाटिल यांचा सय्यम सुटला आणी मला तक्रार दाखल करायची आहे.असा पविञा घेतल्याने तहसिलदार यांनी झालेली घटना अनावधानाने झाली असुन मी याबाबत दिलगीरी व्यक्त केली.तालूक्याचे एक जबाबदार व्यक्ती असुन हा प्रकार वाढविण्यापेक्षा येथेच थांबलेला बरा म्हणुन डाॅ. पाटील यांनी माघार घेतली.पाचोरा पोलिस निरिक्षक अणिल शिंदे यांनी घटनेचे गांभिर्य समजुन बजावलेली भुमिका सर्वञ चर्चेचा विषय बनली आहे.
याप्रकरणी तहसालदार यांना संपर्क साधुन प्रतिक्रिया जानणुन घेतली असता त्यांनी फोन न उचलता तशी बाब नाही असे उत्तर दिले.तर ज्यांच्यावर आपबिती घडली ते डाॅ.पाटिल यांना संपर्क केला असता ते म्हणाले की घटना सत्य असुन तहसिलदार यांनी माफी मागितल्याने हा विषय संपला आहे.घटना घडतांना मी संय्यम ठेवला नसता आणी तहसिलदारांना त्यांच्याच भाषेत,कृतित उत्तर दिले असते तर आज माझ्यावर अनेक कलमांची भर टाकुन गुन्हा दाखल झाला असता. आपण उच्च पदावर अधिकारी म्हणुन काम करतांना कसे वागावे व कशी भुमिका घ्यावी हे तहसिलदार यांना या घटनेनंतर कळेल यात शंका नाही.
पाचोरा शहर व तालुक्यात रेती चोरी करणे ही बाब सर्वसामान्य आहे.मोठे ढंपर,ट्रॅक्टर व मिळेल ती वाहणारे रेती चोरी होती या वाहनांवर कडक कारवाही करतांना प्रांताधिकारी राजेंद्र कचरे हे आक्रमक दिसुन येतात तशी भुमिका तहसिलदारांची दुसुन येत नाही.यात पॅजोतुन रेती वाहतुक करणार्या डाॅक्टरवर अधिकार गाजवतांना तहसालदारांना नेमके काय सिध्द करायचे होते ते अजुनही गुलदस्त्यात असुन या घटनेवरून तालुक्याचे आमदार यांची अधिकार्यावरिल लोकप्रतिनीधी म्हणुन असलेली पकड ही कमी झाल्याचे दिसुन येते.