जळगाव, (प्रतिनिधी)- अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्या जागी अचानक नव्या अधिष्ठाता यांच्या नियुक्तीचे आदेश झाल्याने गेल्या काही दिवसांपासून अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे व सिव्हिल सर्जन डॉ.एन.एस.चव्हाण यांच्यात कलह निर्माण करण्यास यशस्वी ठरणारा तो “कळीचा नारद” कोण अशी रंगतदार चर्चा होत आहे.
अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे व सिव्हिल सर्जन डॉ.एन.एस.चव्हाण यांच्यात समन्वय नसल्याच्या घटना समोर आल्यावर अखेर पालकमंत्र्यांनी देखील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्वय राखून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.परंतु या दोन्हीही अधिकाऱ्यांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष भरण्याचे काम ज्या “काळलाव्या नारदाने” केला त्याचा चेहरा देखील उघड होणे गरजेजे आहे.
सत्तेचे सूत्र आपल्या हाती राहावे म्हणून लावली जाते ‘कळ’
प्रमुख पदावर कुणीही असो प्रशासनाची सूत्रे आपल्या हाती राहावे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याने आपलेच ऐकावे या विकृत मानसिकतेतून हा “काळलाव्या नारद” सातत्याने असे प्रयोग करत येत आहे आणि यात तो यशस्वी होत असल्याने त्याच्या वाटेला देखील कोणी जात नाही अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.असे असले तरी भविष्यातील प्रशासनाचे नुकसान टाळण्यासाठी या “काळलाव्या नारदाच्या” शोध घेऊन उघडे पाडणे आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांनी देखील हलक्या कानाचे राहू नये
उच्च पदावर काम करतांना अधिकाऱ्यांनी देखील हलक्या कानाचे राहू नये.इकडच्या तिकडे करणाऱ्याला वेळीच धडा शिकवावा असे मत काहींचे असले तरी पुन्हा यावेळी ‘कळ’ लावण्यात संबंधिताला यश आले आहे.
आजकाल ‘कळींच्या नारदांची’ संख्या फार वाढत आहेत.त्यामुळे लोक ऐकमेकांशी बोलायला घाबरतात.आपल्याकडून गोड बोलून घेवून आपल्याविषयी दुसर्याच्या मनात कोण कान भरील काहीच सांगता येत नाही एवढचं नाही तर त्याला मीठ मसाला लावून रंगतदार बनवण्यामध्ये अनेक जण माहीर आहेत.कुणावर विश्वास ठेवावा हेच समजत नाही.आपल्याबद्दल दुसर्याच्या मनात संशय निर्माण करणे किंवा त्याला भडकावणे हे काहीजण करत असतात हे आता पाहायला मिळत आहे.















