चाळीसगाव – जळगाव येथील अंकुर साहित्य संघाच्या चाळीसगाव शाखेने शहरातील अरिहंत मंगल कार्यालयात तीन दिवसीय अंकुर महोत्सवाचे आयोजन केले आहे. २२ ते २४ नोव्हेंबर या तीन दिवसात विनोदाचा खजिना आणि संगीताचा नजराणा रसिक प्रेक्षकांना मिळणार.
२२ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता गदिमा पुरस्कार विजेते हास्य सम्राट अरविंद भोंडे यांचा तुफान विनोदी किस्से व कवितांचा ‘कार्यक्रम असा की पोटभर हसा’, २३ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता संपूर्ण खान्देशासह महाराष्ट्रभर हास्य कल्लोळ माजवणारा प्रवीण माळी यांचा विनोदी कार्यक्रम ‘आयत पोयत सख्यान’, तर २४ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता गायक-वादक आणि विनोदमूर्ती गिरीश मोघे आणि सहकारी प्रस्तुत ‘सांजवेळ सप्तसुरांची मैफिल गीत संगीताची’ असे भरगच्च कार्यक्रम हाेणार आहेत. रसिक, प्रेक्षकांनी या तिन्ही कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अंकुर साहित्य संघाच्या जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ.साधना निकम, सचिव शालिग्राम निकम, कार्याध्यक्ष रमेश पोतदार तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.















