Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यात बालविवाहाचे 28 टक्के प्रमाण

युनिसेफच्या माध्यम सल्लागार डॉ.सरिता शंकरन् यांची वेबसंवादात माहिती

najarkaid live by najarkaid live
October 20, 2022
in जळगाव
0
लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यात बालविवाहाचे 28 टक्के प्रमाण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- बालविवाह ही जागतिक समस्या आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये जळगाव जिल्ह्यात 28 टक्के बालविवाह झाल्याचे निदर्शनास आले असून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीसह धोरणात्मक बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युनिसेफच्या माध्यम सल्लागार डॉ.सरिता शंकरन् यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बालविवाह प्रतिबंध आणि युवकांचा सहभाग’ या विषयावरील वेबसंवादात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे यांच्यासह मुख्य आयोजक जनसंवाद आणि पत्रकारिता विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, युनिसेफच्या माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये यांच्यासह डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.सरिता शंकरन् म्हणाल्या की, ग्रामीण भागात किंवा अशिक्षित कुटुंबामध्ये बालविवाहाचे प्रमाण दिसून येते. त्यामुळे बालविवाह कायदा आणि बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. बालविवाह रोखण्याची जबाबदारी ही केवळ शासन, प्रशासनाचीच नव्हेतर समाजातील सर्वच घटकांची आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी माध्यमांसह माध्यमांसह युवकांचा सहभाग अतिशय महत्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जळगाव जिल्ह्यात काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बालविवाह विरोधी जनजागृती करण्यासाठी काही वर्षापासून काम सुरू आहे. बालविवाह रोखण्याच्या कार्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असला तरी यात अजून अधिक संख्येने युवकांनी सहभागी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. अनिल चिकाटे यांनी, भारतात तसेच महाराष्ट्रात बालविवाहाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. बालविवाह रोखण्यासाठी कायदे असूनही कायद्याचे उल्लंघन असल्याची खंत व्यक्त करत बालविवाहाच्या होण्याच्या अनेक कारणांवर त्यांनी प्रकाश टाकला. प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकर यांनी बालविवाहामुळे अनेक समस्या निर्माण होतात. बालविवाह रोखण्यासाठी युवकांचा सहभाग महत्वाचा असल्याची भूमिका त्यांनी विषद केली. वक्त्यांचा परिचय युनिसेफच्या माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रेरणा पाटील हिने केले. आभार निकिता भोई हिने मानले. यशस्वितेसाठी रंजना चौधरी, प्रकाश सपकाळे, प्रल्हाद लोहार, तुषार महाजन, समाधान वाघ यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी एम.राजकुमार यांची वर्णी

Next Post

फेसबुकवर मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि मग लग्न ; पण लग्नानंतर मुलीसोबत घडला धक्कादायक प्रकार..

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
मोठा निर्णय : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्तावास केंद्राची मंजुरी!

फेसबुकवर मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि मग लग्न ; पण लग्नानंतर मुलीसोबत घडला धक्कादायक प्रकार..

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us