Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतात ‘करोना’चा शिरकाव; केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

najarkaid live by najarkaid live
January 30, 2020
in राष्ट्रीय
0
भारतात ‘करोना’चा शिरकाव; केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

तिरुवनंतपुरम – चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोना व्हायरसचा पहिला रुग्ण भारतात आढळला आहे. केरळमध्ये चीनहून परतलेल्या एका विद्यार्थ्याला करोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विद्यार्थी वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असून सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. चीनमध्ये आतापर्यंत करोना व्हायरसने १७० जणांचा बळी घेतला आहे. 

तर, गाझियाबाद आणि गुडगावमध्ये देखील संशयित रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. हे रुग्ण देखील नुकतेच चीनहून परत आले आहेत. या पूर्वी मुंबई, जयपूर, बिहारच्या छपरा येथे संशयित रुग्ण आढळले आहेत. तथापि, दिल्लीतील हॉस्पिटल आणि विमानतळांवर करोना संदर्भात तपासणीसाठीची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळांवर याबाबत तपासणी होत असून दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात देखील तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

गुडगाव-गाझियाबादमध्ये ३ संशयित

बुधवारी दिल्लीत पोहोचलेल्या गुडगावच्या दोन लोकांची विमानतळावरच तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या रुग्णांना ताप आणि खोकला होत होता. याबाबतची माहिती तातडीनं जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आली. या बरोबरच गाझियाबादमध्येही एक संशयित रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी ८ दिवसांपूर्वी चीनहून आलेल्या इंदिरापुरममध्ये आपल्या भावाकडे आलेल्या एका तरुणीलाही करोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंगल कार्यालयाची भव्य दिव्य  वास्तू तेली समाज एकजुटीचे प्रतीक 

Next Post

माझी आमदारकी संपविण्याची अधिकार्‍यांनी घेतली ‘सुपारी’

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
माझी आमदारकी संपविण्याची अधिकार्‍यांनी घेतली ‘सुपारी’

माझी आमदारकी संपविण्याची अधिकार्‍यांनी घेतली ‘सुपारी’

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us