Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर पक्ष फोडाफोडीचे राजकारणच झाले नसते !

मधुकरराव चौधरी यांच्या कृतज्ञता सोहळ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे गौरवोद्गार

najarkaid live by najarkaid live
July 8, 2024
in Uncategorized
0
तर पक्ष फोडाफोडीचे राजकारणच झाले नसते !
ADVERTISEMENT

Spread the love

खिरोदा ता. रावेर : मधुकरराव चौधरी यांनी ३० वर्षे मंत्रिपदाची धुरा सांभाळत सर्व विभागाला न्याय दिला. शिक्षण क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली. आज जर ते सभापती असते तर पाच वर्षांत ज्या घडामोडी घडल्या, त्या घडल्या नसत्या व पक्ष फोडाफोडीचे राजकारणही झाले नसते, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘कृतज्ञता सोहळ्यात’  मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला.

विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन आमदार शिरीष चौधरी व मधुस्नेह परिवारातर्फे रविवारी खिरोदा येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना महामारीच्या काळात प्रशासन गतिमान करून रुग्णांचे प्राण वाचवणारे माजी मंत्री राजेश टोपे,बाळासाहेब थोरात, माजी गृह मंत्री अनिल देशमुख, सतेज पाटील यांचा तसेच केळीचा समावेश विमा योजनेत केल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचा सन्मानपत्र व केळीचा घड देऊन सन्मान करण्यात आला.

राजेश टोपे म्हणाले की, मधुकरराव चौधरी हे आदर्श व्यक्तिमत्त्व होते. पंचवीस वर्षांच्या राजकारणात मधुकरराव हे निष्कलंक राहिले, हा त्यांच्या कार्याचा गौरवच आहे. सतेज पाटील यांनी मधुकरराव चौधरी यांच्यासारखी माणसं समाजात शोधून मिळणार नाहीत, असे सांगितले.

उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ संदेश

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात व्हिडीओ संदेश दिला. ते म्हणाले की, कृतघ्न वातावरणात कृतज्ञता सोहळा घेऊन समाजाचे ऋण फेडणारे फार दुर्मीळ असतात. ठाकरे व चौधरी परिवारामध्ये असलेल्या ऋणानुबंधाला त्यांनी उजाळा दिला. मधुकरराव चौधरी यांचे शिक्षणमंत्री असतानाच्या कार्याचेही ठाकरे यांनी कौतुक केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी चौधरी परिवारातील चौथ्या पिढीचे वारसदार धनंजय चौधरी यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, असे आवाहन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोना महामारीवर सर्वाधिक नियंत्रण मिळवल्याने जगाने महाराष्ट्राचे कौतुक केले. मधुकरराव चौधरी यांचे विधानसभेचे सभापती म्हणून अतिशय शिस्तप्रिय काम होते. अनेक सदस्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. आमदार शिरीष चौधरी यांनी कृतज्ञता जोपासणे हा एक मोठा संस्कार आहे व ती माझ्या वडिलांची शिकवण असल्याचा उल्लेख केला. प्रास्ताविक व आभार एन.एस.यू.आय.चे प्रदेश सचिव धनंजय चौधरी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. जगदीश पाटील व सुरेश पाटील यांनी केले.

या मान्यवरांची होती उपस्थिती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे, माजी आमदार दिलीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार रमेश चौधरी, दिलीप भोळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खंडोबा देवस्थानचे प्रमुख महंत पुरुषोत्तमदास महाराज, माजी आमदार सुधीर तांबे, माजी महापौर जयश्री महाजन उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनोळखी Video कॉल उचलणं पडलं महागात…तो एका महिलेचा न्यूड कॉल होता,सेक्सटॉर्शनची घटना!

Next Post

राज्यात पुढील तीन दिवस ‘या’ भागात पाऊस धो धो बरसणार!

Related Posts

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

राज्यात पुढील तीन दिवस 'या' भागात पाऊस धो धो बरसणार!

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us