Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनच्या उच्चकृषी तंत्रज्ञानाने राजस्थानचे शेतकरी समृद्ध करणार -राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत

najarkaid live by najarkaid live
September 27, 2019
in जळगाव
0
जैन इरिगेशनच्या उच्चकृषी तंत्रज्ञानाने राजस्थानचे शेतकरी समृद्ध करणार -राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी (दि.27)- संपूर्ण देशात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यात राजस्थानमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला पिण्याचे शुद्ध पाणी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध रहावे, यासाठी आताच सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचदृष्टीने जैन इरिगेशनने निर्माण केलेल्या पाणी निम्म्यानं,उत्पादन दुप्पटीने देणारे ठिबक, स्प्रिंकलर्सचे उच्च कृषि तंत्रज्ञान राजस्थानमधील शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी जैन इरिगेशनने पुढाकार घेऊन त्याचा प्रचार–प्रसार करावा, यासाठी राजस्थान सरकार जैन इरिगेशनसोबत असेल; असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले.

जैन इरिगेशनचे कृषिविषयक हायटेक तंत्रज्ञान समजुन घेण्यासाठी आले असता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत बोलत होते.त्यांच्यासोबत राजस्थानचे कृषिमंत्री लालचंद कटारिया, खाण व गोपालन मंत्री प्रमोद भाया,आमदार रोहीत बोहरा, मुख्य सचिव कुलदिप रांका उपस्थित होते. यावेळी त्यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फुडूसचे संचालक अथांग जैन उपस्थित होते.

पाण्याची टंचाई पाहता शेतीला पाट पद्धतीने पाणी न देता ते ठिबक, स्प्रिंकलर्स अशा अत्याधुनिक सिंचन तंत्राद्वारे द्यावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राजस्थानमधील शेतकरी हा बदल आत्मसात करील अशी अपेक्षाही व्यक्त केली. राजस्थान देशातील सर्वात मोठे राज्य आहे. मोठे क्षेत्रफळ आहे. शेतीवर मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. परंतु पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे. भविष्यात पाण्याची तीव्रता अधिक जाणवेल. त्यामुळे ठिबकचे महत्त्व राजस्थाने समजले आहे.येणाऱ्या पिढीसाठी ठिबकचा राजस्थानमध्ये प्रचार–प्रसार करण्याचा प्रयत्न करणार आहे.पाण्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग व्हावा आणि शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी आताच शेतकऱ्यांनी आवश्यक पावले उचली पाहिजे.ठिबक सिंचनासह आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तसेच राजस्थानमधील प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी जैन इरिगेशनच्या सहकार्याने यापुढेही नवनवीन संकल्पना राबवून राजस्थान समृद्ध करणाचे सुतोवाच त्यांनी केले.यासाठी जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.पाण्यावर महत्त्वाचे कार्य करणाऱ्या इस्त्राइलमध्येसुद्धा जैन इरिगेशन कार्य करीत आहे. तेथील त्यांचे पाणी आणि शेतीविषयक कार्य मी जवळून पाहिले आहे. इस्त्राइल येथील हे तंत्रज्ञान भारतात जैन इरिगेशनने आणले याचा अभिमान असल्याचेही मुख्यमंत्री अशोक गहलोत यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड्स लि. च्या मसाले प्रकल्पासही भेट दिली. या प्रकल्पासाठी काही कच्चा माल हा राजस्थान येथून येत असल्याने या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रकल्पासाठी राजस्थानच्या शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे सुतोवाच केले.

जैन इरिगेशनने विकसीत केलेल्या जैन स्वीट ऑरेंज या वाणाची माहिती जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्याकडून समजून घेताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, कृषिमंत्री लालचंद कटारिया, खाण व गोपालन मंत्री प्रमोद भाया,आमदार रोहीत बोहरा, मुख्य सचिव कुलदिप रांका आदि.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी तीर्थ नव्या पिढीला प्रेरक- अशोक गहलोत

Next Post

स्विकृत नगरसेवक पदी बशिर बागवान 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
स्विकृत नगरसेवक पदी बशिर बागवान 

स्विकृत नगरसेवक पदी बशिर बागवान 

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us