Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथे राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा २७ डिसेंबर  ते ४ जानेवारी दरम्यान स्पर्धेचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
December 23, 2023
in जळगाव
0
जळगाव येथे राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा २७ डिसेंबर  ते ४ जानेवारी दरम्यान स्पर्धेचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. २३ (प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघ यांच्या मान्यतेने जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या आवारात २७ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ या नऊ दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय सब ज्युनिअर (१५ वर्षा आतील मुले व मुलींच्या) बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जैन इरिगेशन सिस्टीम्स ली. चे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनीआज दिनांक २३ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.बोलतांना पुढे ते म्हणाले की शाळांमधून स्पोर्ट्सला वाव मिळाला पाहिजे, शैक्षणिक विकासासोबत क्रीडाची जोड मिळाल्यास विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतं असल्याचे त्यांनी बोलतांना यावेळी सांगितले.

या राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धा स्विस-लीग प्रकाराने खेळविण्यात येणार असून स्पर्धकांना ११ फेऱ्यात विविध स्पर्धकांशी मुकाबला करावा लागणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत एकूण नऊ लाखांची रोख पारितोषिके व वयोगटानुसार प्रथम तीन विजेत्यांना चषक देण्यात येतील तसेच प्रत्येक सहभागी खेळाडूंना पदके देण्यात येणार आहेत.

या संपूर्ण स्पर्धेचे प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या जळगाव शहरातील सुप्रसिद्ध कंपनीने स्वीकारले आहे हेच नव्हे तर आयोजनामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा असल्याची माहिती आयोजन समितीचे नंदलाल गादिया यांनी सांगितलं.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना अतुल जैन पुढे म्हणाले की,या राष्ट्रीय स्पर्धेत जम्मू-काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील विविध २५ राज्यातील २९४ मुले व मुलीं खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. त्यात CM मयंक चक्रवर्ती, आसाम – २४०३, FM दक्षिनगा तैन्नारासु, तामिळनाडू – २३३२, CM शेख सुमेर अर्श, तेलंगाना २२५५, FM शुभ गुप्ता, उत्तरप्रदेश, साची जैन, दिल्ली ईत्यादी.. विविध टायटल प्राप्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. १२८ मुलांपैकी ११४ तर ८६ मुलींनपैकी ७२ फिडे मानांकन प्राप्त खेळाडू असे २९४ स्पर्धक आहेत.

महाराष्ट्र, आसाम, तामिळनाडू, तेलंगाना, राजस्थान, आन्द्रप्रदेश, दिल्ली, वेस्ट बंगाल, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, चंडीगड, हरियाणा, केरल, गोवा, उत्तराखंड, झारखंड, उडीसा, त्रिपुरा, ई. २५ राज्या मधून खेळाडू येत आहे.तर स्पर्धेसाठी मुख्यपंच म्हणून कलकता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशीस बरुआ, सहायक पंच पुणे येथील आंतरराष्ट्रीय पंच विनिता श्रोत्री व त्यांना मदतनीस ९ पंच असतील.

आपापल्या राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंची व संघ प्रशिक्षक अथवा संघ व्यवस्थापक यांची निवास व्यवस्था जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. द्वारेकरण्यात आली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेतून सहभागी खेळाडूंना आपले फिडे मानांकन उंचविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे तसेच ग्रांड मास्टर ही उपाधी मिळविण्यासाठीची वाटचाल या स्पर्धेद्वारे खेळाडूंना मिळणार आहे. या स्पर्धेत प्रथम सहा (६) विजेत्या खेळाडूंची निवड पुढील आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धासाठी करण्यात येईल व हे खेळाडू आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करतील अशी माहित आजच्या पत्रकार परिषदेत जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे अध्यक्ष व स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारलेल्या जैन इरिगेशन कंपनीचे सह- व्यवस्थापकीय संचालक श्री अतुल जैन यांनी दिली.

या पत्रकार परिषदेत असोशिएशनचे सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख, अनिल जोशी व कार्यकारणी सदस्य तसेच जैन स्पोर्ट्स अकादमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनोज जरांगे यांची आज इशारा सभा ; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

Next Post

माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविल्याने भुसावळ मार्गे जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रकात बदल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविल्याने भुसावळ मार्गे जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रकात बदल

माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविल्याने भुसावळ मार्गे जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रकात बदल

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us