Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावच्या कुटुंबाला नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ‘इतक्या’ लाखात गंडविले

Editorial Team by Editorial Team
March 28, 2023
in जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : प्रत्येक तरुणाला वाटत असते कि आपल्यालाही सरकारी नोकरी लागावी. मात्र नोकरी मिळणे आजकाल सोपे नाहीय. त्यातही काही पालक मुलांच्या सरकारी नोकरीसाठी वशिला लावण्यासाठी पैसे देण्यास तयार आहेत. मात्र, याचाच फायदा घेत भामटे घेत आहेत. असाच धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला.

मंत्रालयात तसेच रेल्वेत मोठ्या जागेवर सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील एका कुटुंबाची तब्बल २२ लाखांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी  रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यादरम्यान संबंधितांनी नोकरीच्या ऑर्डरही दिल्या, मात्र त्या बनावट असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक असे की, शिव कॉलनीतील रहिवासी प्रवीणचंद्र दिघोळे (वय ५८, रा. शिव कॉलनी, जळगाव) यांना चंद्रभान ओसवाल व त्याचा भाऊ अनिल ओसवाल (दोघे रा. धुळे) यांनी तुमच्या मुलाला मंत्रालयात नोकरी लावून देतो, असे २०१८ मध्ये सांगितले होते. १० मे २०१८ रोजी दोघे दिघोळे यांच्या घरी येत मंत्रालयात आमचे अधिकारी परिचयाचे असून, त्यासाठी २२ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. दिघोळे यांनी दोघांना नऊ लाख रुपये रोख दिले. २७ मे रोजी पुन्हा घरी बोलावून सात लाख रुपये दिले. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रभान ओसवाल हा बनावट नियुक्तीपत्र घेवून दिघोळेंकडे येत तुमच्या मुलाचे काम झाले असून, १८ फेब्रुवारी २०२१ रोजी कामावर रुजू केले जाणार असल्याचे त्याने सांगितले.

हे पण वाचा..

देशात कोरोनाची नवी लाट येणार? 24 तासात आढळले तब्बल ‘एवढे’ रुग्ण

शेअर बाजारात पुन्हा गोंधळ ; ‘या’ कारणामुळे अदानी शेअर पुन्हा घसरले ; गुंतवणूक करण्यापूर्वी घ्या जाणून

कोयता गँग धुमाकूळ : केकचे पैसे मागितल्याने दुकानदारावर हल्ला, धडकी भरवणारा Video व्हायरल

ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार

मात्र, दिघोळे मुंबईत गेले. मात्र, त्यांना कुणीही भेटले नाही. शेवटी त्यांना पुन्हा माघारी परतावे लागले. त्यानंतर दिघोळेंना ओसवाल याने तुम्हाला दुसरी नोकरी देतो, असे सांगत त्यानेच ओळख करून दिलेल्या हरताली प्रसाद रोहिदास याने दिघोळेंना मुलाला रेल्वेत कनिष्ठ अभियंतापदाचे नियुक्तीपत्र देतो, असे आमिष दाखवून सहा लाख रुपये मागितले. दिघोळेंनी हरतालीच्या बँक खात्यावर ८ ते ११ नोव्हेंबर २०२१ दरम्यान सहा लाख रुपये पाठविताच दिघोळेंच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नियुक्तीपत्र पाठविले. मात्र, त्यांना कुठलीही नोकरी लावून दिली नाही. आपली फसवणूक झाल्याने दिघोळे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रभान ओसवाल, अनिल ओसवाल, हरताली प्रसाद रोहिदास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशात कोरोनाची नवी लाट येणार? 24 तासात आढळले तब्बल ‘एवढे’ रुग्ण

Next Post

अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज

अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us