Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे?

najarkaid live by najarkaid live
September 30, 2019
in राजकारण
0
आदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात अचानक झालेल्या भेटीमागे मोठे कारण असल्याचं समोर येत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास सज्ज असलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. आदित्य यांना बिनविरोध निवडून द्या, अशी विनंती राऊत यांनी या भेटीत केल्याचं सूत्रांकडून समजतं.
अजित पवारांच्या राजीनाम्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथापालथ सुरू असताना शनिवारी दुपारी अचानक संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुंबईतील ’सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. ही भेट कौटुंबिक होती, असं राऊत यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. मात्र, या भेटीत नक्कीच काहीतरी राजकीय असावं, असे आडाखे बांधले जात होते. त्यात तथ्य असल्याचं सूत्रांकडून समजतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांचा संभाव्य विधानसभा प्रवेश सुकर व्हावा, यासाठी ही भेट झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. आदित्य हे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातं. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. सध्या शिवसेनावासी झालेले सचिन अहिर हे आधी येथून आमदार होते. अहिर यांनी पक्ष बदलला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा नव्या जोमानं लढवण्याच्या प्रयत्नांत आहे. मात्र, आदित्य येथून उभे राहिल्यास त्यांना विरोध होऊ नये असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं समजतं.
पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली तेव्हा शिवसेनाप्रुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी बारामतीतून उमेदवार दिला नव्हता. हा पदरही या मागणीला आहे. पवारांनी शिवसेनेची ही विनंती मान्य केल्यास पवार कुटुंबातील पुढच्या पिढीला म्हणजेच, रोहित पवार किंवा पार्थ पवार यांनाही भविष्यात त्याचा फायदा मिळू शकतो, असाही एक कयास आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंगाडे मोर्चे कुठे गेले… पद असताना चार वर्षे गप्पांमध्येच गेले – लकी अण्णा टेलर 

Next Post

येणार असाल तर आजच ठरवा!; आघाडीचं भाजप-सेनेतील नाराजांना आवाहन

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
येणार असाल तर आजच ठरवा!; आघाडीचं भाजप-सेनेतील नाराजांना आवाहन

येणार असाल तर आजच ठरवा!; आघाडीचं भाजप-सेनेतील नाराजांना आवाहन

ताज्या बातम्या

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

March 15, 2026
धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

March 15, 2026
मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

March 15, 2026
CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us